
दैनिक वृत्तपत्र म्टटलं, कि वृत्तपत्रात नवनव्या नोकऱ्यांच्या जाहीरातीही येत असतात. गेल्या काही दिवसात एचडीएफसी या बँकेच्या जाहीरातीने वाचकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने नोकरीची संधी असलेली जाहीरातीत कोविड २०२१ काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांनी या पदासाठी अर्ज करु नये अशी अट घातील होती. ही जाहीरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. या जाहीरातीवर मोठ्या प्रमाणात टिका झाल्यामुळे एडीएफसी बँकेने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.
मागील एक वर्षापासून संपूर्ण शाळा कॉलेज बंद आहेत. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या गुणांवर निकाल जाहीर केले. विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची चिंता असताना एचडीएफसी बँकेने आपल्या तमिळनाडू येथील मदुराई या शाखेत नोकर भरतीची जाहीरात दिली. ज्यामध्ये २०२१ सालात पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करु नये अशी अट घालण्यात आली होती.
या जाहीरातीवर बँकेने आपली चूक मान्य केली आहे. जाहीरात टाईप करताना ही चुक झाल्याचे बँकेने म्हटले आहे. तसेच त्यांनी नवी जाहीरात जाहीर करून त्यामध्ये २०२१ मध्ये पास झालेले विद्यार्थीही अर्ज करु शकतात असे स्पष्ट केले आहे.