एकीकडे ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे लोकांमध्ये फार चिंता वाढत आहे आणि त्यातच आता फ्लुरोनाचा उगम झाला आहे. या नव्या फ्लुरोनामुळेसुद्धा लोकांमध्ये भीतीचे वातावरण हळूहळू वाढत आहे. मात्र प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे, फ्लुरोना हा कोरोनाचा कोणत्याही प्रकारचा नवा व्हेरियंट नसून कोविड-१९ आणि इन्फ्लूएंजा व्हायरस चे संमिश्र स्वरूप आहे.
चला तर मग जाणून घेऊ, नक्की काय आहे हा फ्लुरोना.
काय आहे फ्लुरोना ?
फ्लुरोना हा कोरोनाचा कोणत्याही प्रकारचा नवा व्हेरियंट नसून कोविड-१९ आणि इन्फ्लूएंजा व्हायरस चे संमिश्र संक्रमण आहे. शास्त्रज्ञांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. एका रूग्णाला फ्लुरोना संक्रमित म्हणून तेव्हाच गणले जाईल जेव्हा त्याच्या शरीरात कोविड-१९ आणि इन्फ्लूएंजा व्हायरस एकाच वेळी प्रवेश करतील. ही एक अशी स्थिती असते ज्याला मानवी शरीर पटकन अनुमती देते. फ्लुरोनाचे संक्रमण हे जवळपास डेल्मिक्रोन (Delmicron) सारखेच असते. डेल्मिक्रोन ती स्थिती आहे ज्यात डेल्टा आणि ओमायक्रोन हे एकाच वेळेला शरीरावर हमला करतात.
दुहेरी संक्रमण अतिगंभीर !
शास्त्रज्ञांच्या मते, फ्लुरोना फारच गंभीर ठरू शकतो. ज्यात शेवटच्या टप्प्यात न्यूमोनिया, मायोकार्डिटिस आणि इतर श्वसन संबंधी समस्या देखील होऊ शकतात. त्यामुळे समजा तुम्हाला फ्लुरोना झाला तर त्याला फार गांभीर्यपूर्वक घ्यावे, असे आवाहन शास्त्रज्ञ व डॉक्टर्स करत आहेत. फ्लुरोना झालेल्या रूग्णाने जर त्याकडे दुर्लक्ष केले अथवा आवश्यक ते वैद्यकीय उपचार वेळेवर घेतले नाहीत तर मृत्यू देखील ओढावू शकतो.
कुठे मिळाला पहिला रूग्ण ?
इस्त्रायलचे शासकीय वृत्तपत्र येदिओथ अर्होनोथ ने सर्वात आधी ‘फ्लुरोना’ संक्रमणाची सूचना दिली. दुहेरी व्हायरस संक्रमित एक महिला गेल्याच आठवड्यात इस्त्रायलमधील रॉबिन मेडिकल सेंटर येते प्रसूतिसाठी आली होती. तिला अपेक्षेनुसार सौम्य लक्षणे दिसून आली होती.
का होतो फ्लुरोना ?
जेव्हा शरीरामध्ये कोविड-१९ आणि इन्फ्लूएंजा व्हायरस चे संमिश्र संक्रमण होते त्या स्थितीला फ्लुरोना असे संबोधतात. याप्रकारचे दुहेरी संक्रमण मानवी शरीराच्या प्रतिकारक्षमतेसही (Immunity System) मोठ्या प्रमाणात बाधा पोहोचवते. दरम्यान, काही शास्त्रज्ञांनी डेल्टा आणि ओमायक्रोन व्हेरियंट च्या संयोजित डेल्मायक्रोन (Delmicron) पासूनही सावधतेचा इशारा दिला आहे.
भारतामध्ये फ्लुरोनाचा अजूनही शिरकाव झालेला नाही. सद्यस्थितीला फ्लुरोनाचे रुग्ण हे फक्त इस्त्रायल मध्ये आढळून येत आहेत. मात्र असे असले तरी आपण काळजी बाळगायला हवी व कोरोनाच्या त्रिसूत्री नियंमाचे काटेकोरपणे पालन करायला हवे.