Home ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय ‘Forbes’ 2022 मॅगझीनमध्ये झळकले महाराष्ट्राचे दोन हिरे; सारंग बोबडे आणि राजू...

आंतरराष्ट्रीय ‘Forbes’ 2022 मॅगझीनमध्ये झळकले महाराष्ट्राचे दोन हिरे; सारंग बोबडे आणि राजू केंद्रेची यशस्वी काहाणी!!

257
0
महाराष्ट्राच्या तरूणांच्या कामगिरीची २०२२ च्या फोर्ब्स मॅगझीनमध्ये दखल

प्रामाणिक आणि निस्वार्थीपणे केलेल्या कामाची दखल ही समाज नक्कीच घेत असतो. महाराष्ट्रातील अशाच अतुलनीय कामगिरीची दखल थेट जगाच्या नामांकित मॅगझीन फोर्ब्सने घेतली आहे. २०२२ च्या फोर्ब्स (Forbes) इंडिया मॅगझीनने तीस वर्षांखालील ‘गेम चेंजर’ या गटातील तीस जणांच्या यादीत महाराष्ट्रातील चंद्रपूरचा सारंग बोबडे Sarang Bobade आणि बुलढाण्याचा राजू केंद्रे Raju Kendra या दोघांचा समावेश केला आहे. आपण समाजाचे काही देणं लागतो या भूमिकेतून दोघांनीही अनोखा उपक्रम राबविला आहे.

महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणाऱ्या हिऱ्यांची काहीणी

चंद्रपूर जिल्ह्याचे २६ वर्षीय सारंग बोबडे यांनी आपले सहकारी अनिलकुमार रेड्डी व संदिप शर्मा यांच्यासोबत मिळून समाजसेवेसाठी इच्छुकांना एक पारदर्शक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. समाजात अनेक सेवाभावी संस्था काम करत असतात या संस्थांमार्फत मदतीसाठी आपलाही खारीचा वाटा हवा अशी इच्छा अनेकांची असते. मात्र आपण दिलेला आर्थिक सहाय्याचा योग्य मार्गे उपयोग होतोय का अशी शंका असणाऱ्यांसाठी सारंग बोबडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘डोनेटकार्ट’ हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केले आहे. ज्यामध्ये मदत करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला गरजू व्यक्ती अथवा संस्थेसाठी थेट वस्तू खरेदी करता येणार आहे. यात पारदर्शकता असून मदत करणाऱ्याला समाधान आणि मदत मिळणाऱ्याला सहकार्य होणार आहे. २०१७ साली सुरु केलेल्या या कंपनीमार्फत आजवर १५० कोटींचा निधी हजारो स्वयंसेवी संस्थांपर्यंत पुरविण्यात आला आहे.

बुलढाण्याच्या राजू केंद्रे यांनीही आपल्या आयुष्यात पैशापेक्षा सामाजसेवेला प्राधान्य दिले आहे. देशात गरीबीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राजू केंद्रे यांनी ‘एकलव्य’ फाउंडेशन स्थापन केले आहे. राजू केंद्रे यांचे आई-वडीलांचे प्राथमिक शिक्षणही झालेले नाही. केंद्रे कुटुंबातील राजू केंद्रे ही पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे. त्यामुळे बहुजन समाजातील गरिब विद्यार्थ्यांपैकी शिक्षणाची भूक असणाऱ्यांसाठी त्यांनी एकलव्य संस्थेमार्फत मदत करण्याची भूमिका घेतली. या अतुलनीय कामगिरीसाठी राजू सध्या ब्रिटीश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशिपवर लंडनमध्ये उच्चशिक्षण घेत आहेत. येणाऱ्या सप्टेंबरमध्ये राजू पूर्ण शिक्षण घेऊन भारतात आल्यानंतर या कामगिरीला योग्य तो अधिकचा न्याय नक्कीच देतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

फोर्ब्स यादीत नाव येण्याची प्रक्रिया नेमकी काय असते?

  • जगाच्या नामांकित मासिकांपैकी एक अशा फोर्ब्स मॅगझीनमध्ये अनेक नवनवे उपक्रम होत असतात. यासाठी त्यांचा अधिकृत वेबसाईटवर आपली सर्वत्र माहीती द्यायची असते.
  • एखाद्या उपक्रमासाठी येणाऱ्या माहीतीची तपासणी करणारी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होते. या यंत्रणेमार्फत अर्जदाराच्या सर्व गोष्टी तपासल्या जातात.
  • एखाद्या कामगिरीचा सामाजावर होणारा प्रभाव आणि फॉर्ब्सच्या नियमाप्रमाणे सर्व कामाचा निश्कर्ष काढला जातो.
  • अखेर असंख्य अर्जदारांमधून निवडकांची मॅगझीनसाठी निवड केली जाते.
Previous articleरेल्वेच्या नव्या टेंडर नियमावली विरोधात बूट पॉलिश कामगारांच आंदोलन.
Next articleATM कार्डला पिन म्हणून ठेवली जन्मतारिख, झाले ७५ हजार गायब.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here