भारत देशाची प्रचीती आजवर अनेक देशांनी घेतली आहे. अध्यात्म, योग, शास्त्र यांचा खजिना भारत देशात सापडतो. याच गोष्टीशी प्रेरित होऊन स्वित्झर्लंडचा एक अवलिया बाबा भारतात आला आहे. बेन बाबा असे या साधूंचे नाव असून ते स्वित्झर्लंडचे रहिवाशी आहेत. यावर्षीच्या कुंभमेळ्याला येण्यासाठी या बाबांनी तब्बल ६ हजाराहून अधिक किलोमीटरचा पायी कापले आहे. या प्रवासाची सुरुवात त्यांनी पाच वर्षापूर्वी केली आहे.
३३ वर्षीय बेन बाबा यांची स्वित्झर्लंड मध्ये पेशाने वेब डिझायनर आहेत. घरची परिस्थिती उत्तम असताना देखील त्यांनी या सगळ्याचा त्याग करून अध्यात्म आणि योगशास्त्राचा स्वीकार केला आहे. बेन बाबा स्वित्झर्लंड येथे प्रतीतास १० युरो म्हणजे आपल्या देशातील ७२० रुपये कमावत होते. मात्र यात त्यांना सुख मिळणं कठीण झालं होत. त्यामुळे त्यांनी अध्यात्माच्या स्वीकार केला. सुख पैशांमध्ये नाही तर योग आणि अध्यात्म यात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. लोकांनी गाडी,पैसा, बंगला याचा त्याग करून अध्यात्म आणि योग याचा स्वीकार करायला हवा असा संदेश ते लोकांना देतात.
बेन बाबा योग आणि आध्यात्म याच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्याचे पुढील आयुष्य वाहून दिले आहे. हा प्रवास तो पायीच करण्याचा ध्यास त्यांनी केला आहे. स्वित्झर्लंड ते भारत हा प्रवास बेन यांनी १८ देशातून केला आहे. यात थकल्यावर थांबणे आणि भूक लागल्यावर अन्न शोधणे हाच दिनक्रम त्यांनी केला. ज्या देशाच्या सीमेवर पोहणार त्याच्या आधी तिथला व्हिसा काढून ठेवत असतं. त्यांनी हिंदी भाषेचा अभ्यास स्वित्झर्लंडमध्येच सुरू केला. बेन यांना आता केवळ हिंदी भाषाच नाही तर त्यांना गायत्री मंत्र आणि गंगा आरती पूर्णपणे पाठ आहे. अशा या बेन बाबांचा अध्यात्मिक प्रवास यावर्षीच्या कुंभमेळ्यातील आकर्षण बनले आहे.