Home ताज्या बातम्या गोल्ड मेडल विजेत्या खेळांडूवर अशी वेळ का येते? दिव्यांग नेमबाज दिलराज कौरची...

गोल्ड मेडल विजेत्या खेळांडूवर अशी वेळ का येते? दिव्यांग नेमबाज दिलराज कौरची करुण कहाणी

268
0
diljit kaur para shooter selling chips on road
गांधी पार्क येथे दिलजीत चिप्स विकत असताना

विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेमबाजी स्पर्धेत आपल्या देशासाठी कित्येक पदके मिळवणारी दिव्यांग नेमबाज दिलराज कौर सध्या आपल्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर चिप्स आणि वेफर्सची पाकिटे विकत आहे. विविध स्पर्धांमध्ये तिच्या नावावर तब्बल 24 सुवर्ण, आठ रौप्य आणि तीन कांस्यपदके आहेत. तिने उत्तराखंडच्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत 2016 ते 2021 असे सलग चार वर्ष सुवर्ण पदक मिळवले असून एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. इतकी दैदीप्यमान कामगिरी असून सुद्धा सरकारकडून त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरीची मदत करण्यात आलेली नाही. सोमवारच्या दिवशी दिल्लीतील गांधी पार्क येथील रस्त्यावर दिलजीत तिच्या आईबरोबर चिप्स आणि वेफर्सची पाकिटे विकताना दिसली. उदरनिर्वाहाच्या या तात्पुरत्या आधारावर ती स्वत:च्या पायवर उभं राहण्याचा प्रयत्न करीत आहे.

दिलराजने प्रशासनावर टीका करत सांगितले की, “आपले पंतप्रधान नेहमी सांगत असतात की, आत्मनिर्भर बना. मी सुद्धा चिप्स आणि वेफर्सची पाकिटे विकून आत्मनिर्भर बनू इच्छिते. गेल्या तीन चार महिन्यांपासून घराजवळ दुकान लावत होते मात्र तेथे चांगली विक्री होत नसल्याकारणाने गेल्या काही दिवसांपासून, मी येथे गांधी पार्क येथे येत आहे.”

वडिलांच्या पेन्शनवर चालू आहे घराचा आर्थिक गाडा

दिलराज कौरचे वडील हे सरकारी कर्मचारी होते मात्र 2019 मध्ये त्यांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर दिलजीतचा भाऊ तेजिंदर सिंह याच्या खाजगी नोकरीच्या आधारावर घर चालत होते मात्र याचवर्षीच्या फेब्रुवारी मध्ये तिच्या भावाचेही निधन झाले. त्यामुळे वडिलांची पेन्शन हाच दिलजीतच्या सर्वात मोठा आर्थिक आधार आहे.

खूप मागण्या करूनही नाही मिळाली सरकारी नोकरी

क्रिडा क्षेत्रात दिलराजने केलेल्या कामगिरीच्या आधारावर तिला स्पोर्टस किंवा दिव्यांग कोटयातून शासकीय नोकरी मिळायला हवी होती मात्र वारंवार खूप सारी निवेदनं आणि मागण्या करूनही त्यांच्या हाती निराशाच आली.

आपलं क्रिडा धोरण गंडलय का ?

बरं फक्त दिलजीत नाही तर आपल्या देशात लॉकडाऊन लागल्यापासून अशी कित्येक उदाहरणं आपण बऱ्याचदा पाहीली आहेत. रस्त्यावर विक्री करणं यात गैर काहीच नाही. मात्र छोटया खेळाडूंवर अशी वेळ येणे हे फार दुर्देवी आहे, ज्यामुळे त्यांना आपल्या करियरवर पाणी सोडावे लागत आहे. एकीकडे आपले क्रिकेटपटू महिन्याला कोटयवधी कमावतात पण इतर खेळाडू मात्र मूलभूत गरजांसाठी झगडताना दिसतात. आपल्या देशासाठी क्रिडा क्षेत्रात इतकी चांगली कामगिरीकरून सुध्दा या खेळाडूंवर इतकी वाईट वेळ का यावी ? नक्की त्रुटी आहे तरी कुठे ? आपलं क्रिडा धोरण गंडलय का ?

तुम्हाला काय वाटतं ?

Previous articleडिजिटल इंडियामध्ये श्रीमंत-गरिबामधली दरी गडद होतेय?
Next articleमुंबईकरांना दिलासा, कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमध्ये ईंट्री देण्यावर पालिका करणार विचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here