फातिमा शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ साली पुणे येथे झाला. त्यावेळी शिक्षणाचा प्रसार हा तितक्या मोठ्या प्रमाणावर झालेला नव्हता. अशा काळात समाजविरोधी कृत्य करणाऱ्याला कुठेही स्थान नव्हते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्यावेळी पुण्यात पहिली महिला शाळा सुरु करून सामाज सुधारण्याचा विडा हाती घेतला. तेव्हा गरिब आणि दलितांना शिक्षण देण्याच्या विरोधात महात्मा फुले यांच्या वडीलांनी त्यांना घराबाहेर काढले. अशापरिस्थितीत फातिमा शेख यांनी फुले दाम्पत्यांना आपल्या घरात जागा दिली होती.
या दरम्यानच स्वदेशी पुस्तकालयची सुरुवात फातिमा शेख यांच्या घरात झाली. गरिब, जात,धर्म, लिंग अशा आधारावर वंचित असलेल्यांना शिक्षण देण्याचे काम त्यांनी या स्वदेशी पुस्तकायलातून सुरु केले. या देशात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलल्या योगदानात मोलाचा वाटा असणाऱ्या फातिमा शेख या देशातील पहिल्या मुस्लिम समाजातील शिक्षिका बनल्या होत्या.
त्यांच्या याच कार्याची दखल गुगलेने घेतली आहे. फातिमा शेख यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्ताने गुगले डुडल तयार करुन त्यांनी शिक्षणासाठी केलेल्या अतुल्यपूर्ण कामगिरीला आदरांजली वाहीली आहे.