राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन पुन्हा खडबडून जागे झाले आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे लोकांनी आपल्या सामाजिक कर्तव्याचे भान राखण गरजेचे आहे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन बाबतची तयारी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मात्र लॉकडाऊन हा पर्याय कोणालाही आवडणारा नाही. त्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा आणि लॉकडाऊन टाळा हा मोठा ईशारा राजेश टोपे यांनी दिला आहे. लोक अजूनही निष्काळापणे वावरताना दिसत आहेत. कोणालाही संकटाचे गांभीर्य नाही ही फार मोठी चिंतेची बाब टोपे यांनी व्यक्त केली.
सद्यस्थिती पहाता मी आरोग्य विभागाला सर्व बाजूने तयार राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी ज्या गोष्टीचा अभ्यास करणे गरजेचे आहे त्या सर्व गोष्टी प्राधान्याने करण्यात येत आहेत. यात कडक निर्बंध हा मार्ग फार उपयुक्त ठरेल. निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात न लावता, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न कसा सोडवायचा वैगेरे अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातून ,परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जातो. त्यामुळे तात्काळ लॉकडाउनचा निर्णय घेतला जात नाही. निर्बंध कडक करत जावं लागतं, यासाठी लॉकडाउन हा शेवटी पर्याय ठेवण्यात आला आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. अलीकडे बरेच लोक होम कवारंटाइन होतात, यातील अनेकांची घरं छोटी असतात. त्यामुळे ते संपूर्ण घरालाही बाधित करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात नाही. उपचार होत नसल्याने मग त्यांची परिस्थिती बिघडते आणि त्या अवस्थे ते रुग्णालयात येतात. आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची गरज त्यामुळे वाढली आहे. यासाठी ज्यांचं घर छोटं आहे, ज्यांना विलगीकरणात राहण शक्य नाही त्यांना सरळ सरकारी सीसीसी रुग्णालयात आणलं पाहिजे असे आवाहन राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाला केले आहे.
सध्या केवळ कडक निर्बंध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांनी याला प्रतिसाद देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याल राज्याचे अर्थचक्र सुरु ठेवाण्यासाठी स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न आहे. कारखाने, उद्योगधंदे सुरु ठेवणेही फार गरजेचे आहे. सगळ्याच गोष्टींचा आपण विचार करत असतो. आपण कुठे कमी आहोत असा भाग नाही, पण जर आयसीयू आणि ऑक्सिजनच्या बेड्सचा परिणाम जाणवला तर लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागतो. पण त्याचा अभ्यास करावा लागत असून आमचा विभाग आणि मुख्यमंत्री याची चाचपणी करत आहोत. अर्थचक्रही चाललं पाहिजे आणि जीवही वाचला पाहिजे त्यामुळे यातील मध्यबिंदू गाठावा लागतो आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्यावा लागतो असे टोपे यांनी सांगितले आहे. तसेच लसीकरणाविषयी बोलताना टोपे यांनी सांगितले की लसीकरणात आपण देशात पहिल्या क्रमांकावर आहोत, पण आपल्याला गती वाढवायची आहे. पात्र लोकांच्या लसीकरणासाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे. ४५ वर्षापुढील लोकांना बाहेर काढून लसीकरण केलं पाहिजे. यामुळे गती वाढेल असा मला विश्वास आहे. यातून आपले देशप्रेम, राज्यप्रेम सिद्ध करावे, असे राजेश टोपे सांगितले.