वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) मध्ये भाषण देत असताना पंतप्रधान मोदी यांच टेलीप्रॉम्पटर बंद पडलं. यावरून गेल्या काही तासांपासून त्यांना बऱ्याच टिकेचा सामना देखील करावा लागत आहे. ऐन भाषणात बंद पडलेलं हे टेलिप्रॉम्पटर म्हणजे नक्की काय भानगड आहे, या जाणून घेऊयात…
सोमवार दिनांक १७ जानेवारी रोजी आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या दावोस अजेंडा समिट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सहभाग घेतला होता. हि समिट पूर्णत: व्हर्चुअलरित्या आयोजित करण्यात आली होती. नरेंद्र मोदींनी आपले भाषण सुरू केले मात्र काहीच वेळात तांत्रिक कारणांमुळे मोदींना आपले भाषण थांबवावे लागले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या खूपच वायरल होत आहे. ज्यावरून असा दावा केला जात आहे की, टेलिप्रॉम्पटरमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे पंतप्रधानांना आपले भाषण थांबवावे लागले.
यासंदर्भातील अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही, मात्र विरोधकांनी याला टेलिप्रॉम्पटरची त्रुटी म्हणूनच मोदींना धारेवर धरले आहे. त्याचवेळेला भाजपा नेते मात्र याला टेक्निकल ग्लिच म्हणून मोदींजीचे समर्थन करत आहे. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुद्धा या व्हिडिओला ट्रोल करत ट्विट करून लिहीले की,
इतना झूठ Teleprompter भी नहीं झेल पाया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 18, 2022