Home ताज्या बातम्या कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा देता आली नाही, तर सरकारने नवी नियमावली...

कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा देता आली नाही, तर सरकारने नवी नियमावली केली जाहीर..

220
0
varsha gaikwad
दहावी-बारावीच्या परिक्षेसाठी शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले नवे नियम

राज्यात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना एक खुषखबर दिली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. यादरम्यानच १०-१२ वी बोर्ड परिक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या ओरोग्याशी खेळ करणे चुकीचे आहे यासाठी पुरवणी परिक्षेचा पर्याय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना खुला केला आहे. त्यामुळे परिक्षे दरम्यान विद्यार्थी अथवा त्याच्या परिवारातील कोणाला कोरोनाची लागण झाल्यास त्या विद्यार्थ्याला ही परिक्षा जुलै-ऑगस्ट दरम्यान पुरवणी परिक्षेमध्ये देता येईल. या बाबतची नियमावली शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली आहे.

 

दहावी-बारावीची परीक्षेबाबत नवे नियम पुढीलप्रमाणे,

१. कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा देता आली नाही, तर जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार

२. विद्यार्थ्याला किंवा त्याच्या घरातील सदस्याला कोरोना झाला, परिसरात कोरोनाबाधित अनेक असतील, इमारत/परिसर सील केला असेल,

तर विद्यायनि परीक्षा देऊ नये.

३. विद्यार्थी परीक्षेला येऊ शकला नाही तर, संबंधिक शाळा/महाविद्यालयाने विद्यार्थ्याची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे.

४. अशा विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे.

दहावी बारावीची लेखी परिक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे.

Previous articleRFO दिपाली चव्हाणच्या सुसाईड नोटमध्ये नवनीत राणा यांचा उल्लेख
Next article‘शेतकऱ्यांच्या नावाने मोदी सरकार पेट्रोलवर कमवतं ७६ हजार कोटी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here