Home ताज्या बातम्या “झुकेगा नहीं साला” कर्नाटकच्या शेतकऱ्याने अर्ध्या तासात घेतली १० लाखाची गाडी

“झुकेगा नहीं साला” कर्नाटकच्या शेतकऱ्याने अर्ध्या तासात घेतली १० लाखाची गाडी

312
0
कर्नाटकमधील कम्पेगौडा आरएल नावाच्या शेतकऱ्याने गाडी खरेदीसाठी अर्ध्या तासात उभे केले १० लाख

अलिशान गाडी खरेदी करण्याचे स्वप्न अनेकांचे असते. आपल्या खिशाला झेपेल तसे स्वप्न पाहून लोक गाडी खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र कपड्यावरून एखाद्याची तुलना करणे कर्नाटकात महेंद्रा कंपनीच्या सेल्समनला महागात पडले. कर्नाटक-तुमकूर येथील महेंद्रा कंपनीच्या शोरूममध्ये एक शेतकरी सहजच गेला असता, सेल्समनने कपड्यावरून शेतकऱ्याचा अपमान करत त्याला बाहेरचा दरवाजा दाखवला. हा अपमान शेतकऱ्याला सहन झाला नाही. अपमानाचा बदला म्हणून शेतकऱ्याने थेट पुष्पा सिनेमामधील झुकेगा नही साला या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगप्रमाणे कृती केली.

कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यातील रामनपाल्या येथील केम्पेगौडा आरएल नावाच्या शेतकऱ्याने आपल्या मित्रांसोबत गाडी खरेदी करण्यासाठी महेंद्रा शोरूममध्ये गेला. गाडीची चौकशी करताना सेल्समनने शेतकऱ्याच्या कपड्यावरून गाडी खरेदी करण्याची क्षमता नसावी असा तर्क लावला. खिशात १० रुपये तरी आहेत का? असा सवाल केला. इतक्यावरच न थांबता, हा शेतकरी वेळ घालवण्यासाठी शोरुममध्ये आला असावा असे मानत सेल्समनने शेतकऱ्याला शोरुमचा बाहेरचा दरवाजा दाखवून अपमानित केले. शिवाय अर्ध्या तासात दहा लाख रुपये घेऊन आलात तर नवीकोरी गाडी आजच डिलिव्हर करण्यात येईल असे चॅलेंजही त्याने शेतकऱ्याला केले.

सेल्समनने उडवलेली अशी खिल्ली केम्पेगौडाला सहन झाली नाही. सेल्समनला योग्य धडा शिकवण्याचा निर्धारच केम्पेगौडाने केला. पुढील अर्ध्या तासातच त्याने दहा लाख रुपये जमवून शोरूम गाठले. १० लाखांची रक्कम आणलेली पाहून शोरूममधील कर्मचारीही चक्रावले. यापुढे खरा वाद सुरु झाला. ज्यामध्ये सेल्समनने केलेल्या चॅलेंजनुसार गाडीची आजच डिलिव्हरी मिळायला हवी होती. मात्र शोरूमकडून सुट्टीचे कारण देत पुढील दोन दिवस गाडी डिलिव्हर होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले.

अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या शोरूमचा संताप व्यक्त करत केम्पेगौडा यांनी शोरूममध्येच तांडव केला. शोरूमकडून झालेल्या गैरवर्तनाबाबत केम्पेगौडा यांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. सरतेशेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने सेल्समनने शेतकऱ्याची माफी मागितली. या खऱ्याखुऱ्या पुष्पराजची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

Previous articleदिल्लीत झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक!
Next article२२ महिन्यांच्या पोराचा कारनामा! आईचा मोबाईलमधून उडवले १.४ लाख रूपये!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here