जगात भारी कोल्हापूरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये एक आगळावेगळा व्यवसाय सुरू आहे. कोल्हापूर येथील फुलेवाडी पहिल्या बस स्टॉपजवळ श्रवण टायर अँड सर्व्हिसिंग सेंटर आहे. मात्र हे दुकान सामान्य लोकांचे नसून यामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी ही गतीमंद, मतीमंद, मूकबधिर आहेत. या कौतुकास्पद कामगिरीची मोठी वाहवा होत आहे. सामाजात अनेक लोक शारीरिक व्यंग असलेल्या वर्गाची अनेकदा चेष्टा होत असते. त्यामुळे मनात सतत भिती, निराशा असल्यामुळे अशा वर्गातील लोक सामाजापुढे सहसा येत नाही.
मात्र कोल्हापूरच्या एका अवलियाने सामाजातील अशा वैचारीकतेला चांगलीच चपराक लावली आहे. श्रवण सेंटरचे मालक महेश सुतार हे स्वता एम.ए.बी.पी.एड आहेत. त्यांना शिक्षणानंतर नोकरी न मिळाल्याने वडीलोपार्जित व्यवसायाला हातभार लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी व्यवसायातील सर्व गोष्टींमध्ये निपुणता मिळवल्यानंतर या व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरवले. मात्र हे करताना त्यांनी मगीगंद, गतीमंद, मुकबधिर असलेल्या व्यक्तींनाच प्रधान्याने नोकरी देण्याचा विचार पक्का केला. सामाजाच्यादृष्टीने हास्यास्पद अशा निर्णयावर अनेकांच्या टिकेला त्यांना सामोरे जावे लागले. मात्र घेतलेला हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे महेश सुतार यांनी आपल्या कृतीतून सामाजाला दाखवून दिले आहे.
महेश सुतार यांनी आपल्या दुकानात शारीरिक व्यंग असलेल्या आठ मुलांना घेतले आहे. सर्वप्रथम त्यांना कामाची शिकवण देणं, गिऱ्हाईकांशी त्यांचा संवाद करण अशा सर्व गोष्टी आव्हानात्मक होत्या. यावर मात करून महेश यांनी सर्व मुलांना प्रत्येक गोष्टीची बारकाईने ओळख करून दिली. ती सर्व मुल आता लक्षपूर्वक व मनापासून काम करतात. त्या कामाचा आनंद घेतात. या उपक्रमाचा मोठा फायदा म्हणजे, शारीरिक व बौधिक व्यंगामुळे या मुलांना काही औषध घ्यावी लागत होती मात्र सामान्य माणसाप्रमाणे काम करण्याची सवय मुलांना लागल्याने त्यांची ही औषधही बंद झाली आहेत.
सकाळी नऊ वाजता सर्व मुले वेळेत येतात, लावून दिलेली काम करतात. दुपारी एकत्र जेवण करतात, धम्माल, खोड्या करत मनापासून काम करतात हा या कर्मचाऱ्यांचा रोजचा दिनक्रम आहे. शहाणा सुधृढ माणूस कामचुकारपणे काम करतो अशांना यातून मोठी शिवकण मिळते आहे. महेश सुतार यांनी केलेला हा उपक्रम सामाजिकदृष्ट्या नक्कीच उल्लेखनीय आहे.