Home ताज्या बातम्या परिक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी; महाराष्ट्रात सेंट्रल रेल्वे २०२२ची बंप भरती

परिक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी; महाराष्ट्रात सेंट्रल रेल्वे २०२२ची बंप भरती

318
0
सेंट्रल रेल्वेने महाराष्ट्रत २००० पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात तरूणतरूणी अथक मेहनत करत असतात. यासाठी सेंट्रल रेल्वेने २०२२ ची ॲप्रेंटिस भरतीचे नोटीफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी १० वी पास झालेल्या इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या rrccr.com या अधिकृत वेबासाईटवर जाईन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. दोन हजारहून अधिक जागांसाठी ही भरती काढण्यात आली आहे.

या पदांसाठी असलेली शैक्षणिक पात्रता केवळ दहावी पास असून कमीतकमी ५० टक्के मार्क्स मिळालेल्या उमेदवारांसाठी ही संधी उपलब्ध आहे. तसेच केवळ आयटीआय पास होण्याची आवश्यकता आहे. या अर्जनोंदणीची प्रक्रिया १७ जानेवारी २०२२ पासून सुरु झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी आहे. यासाठी आवश्यक ती सर्व माहीती खालीलप्रमाणे…

मुंबई क्लस्टर – १६५९ पदे
भुसावळ क्लस्टर – ४१८ पदे
पुणे क्लस्टर – १५२ पदे
नागपूर क्लस्टर – ११४ पदे
सोलापूर क्लस्टर – ७९ पदे
एकूण पदांची संख्या – २४२२ पदे

ॲप्रेंटीस पदासाठी उमेदवारांना निवड परीक्षेविना होत आहे. यासाठी १० वी चे मार्क आणि आयटीआय मार्कांच्या आधारे लीस्ट तयार केली जाणार आहे. पुढे क्लस्टरनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अर्जाचे शुल्क सामान्य, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना १०० रुपये आकारण्यात येईल. तसेच इतर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे.

सेंट्रल रेल्वेची २०२२ रिक्रुटमेंट जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा

 

Previous articleकोरोना काळात भारतात आर्थिक विषमता पसरली; अब्जाधीशांची संख्या मात्र वाढली
Next articleनक्की काय असतं Teleprompter ? ज्यावरून मोदींवर टीका होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here