फोर्ब्सने वर्ष २०२१ च्या भारतातील टॉप १० श्रीमंताची यादी जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणे यावेळी देखील रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे यादीत सर्वोच्च स्थानी आहेत. फक्त भारतातच नाही तर मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी अलिबाबाच्या जॅक मा यांना मागे टाकले आहे. ८४.५ बिलियन डॉलरसहीत अंबानी हे जगातील १० व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी आहेत. त्यांच्याकडे ५०.५ बिलियन डॉलरची संपत्ती आहे. जगात त्यांचा २४ वा क्रमांक लागतो. अदानी यांचा समूह अनेक उद्योग क्षेत्रात काम करतो. बंदरे सांभाळण्याऱ्या कंपन्यांमध्ये अदानी यांच्याही कंपनीचा समावेश आहे.
तिसऱ्या स्थानावर HCL Technologies च्या शिव नादर यांचा तिसरा क्रमांक लागत आहे. २३.५ बिलियन डॉलर एवढी त्यांची संपत्ती आहे. जगभरात ते ७१ व्या स्थानावर आहेत.
डी मार्ट या रिटेल ब्रँडचे प्रमुख राधाकिशन दमानी हे श्रीमंताच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. १६.५ बिलियन डॉलर एवढी त्यांची संपत्ती आहे.
देशातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून उदय कोटक यांचे नाव समोर येत आहे. १५.९ बिलियन डॉलर एवढी त्यांच्याकडे संपत्ती आहे.
सहाव्या स्थानावर आहेत सर्वात मोठ्या स्टील कंपनीचे मालक लक्ष्मी निवास मित्तल. मित्तल यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा आकडा आहे १४.९ बिलियन डॉलर. मागच्या वर्षी एस्सार स्टीलचे अधिग्रहण करुन त्यांनी भारतात मोठी गुंतवणूक केली होती.
आदित्य बिर्लाह ग्रुपचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे १२.८ बिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे. शिक्षण, कापड, अॅल्युमिनियम, सिमेंट आणि दूरसंचार क्षेत्रात बिर्ला यांची गुंतवणूक आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सायरस पुनावाला यांचा देखील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश झालेला आहे. सीरम जगातील सर्वात मोठी व्हॅक्सिन उत्पादित करणारी कंपनी म्हणून पुढे आलेली आहे. कोरोना महामारीच्या काळात कोवीशिल्ड लस निर्माण करुन त्यांनी जगाला दिलासा दिला आहे. श्रीमंत भारतीयांच्या यादीत पुनावाला १२.७ बिलियन डॉलर संपत्तीसहीत आठव्या क्रमांकावर आहेत.
सन फार्मा कंपनीचे प्रमुख दिलीप सांघवी हे नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे १०.९ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.
दहाव्या क्रमांकावर भारती एअरटेलचे प्रमुख सुनील भारती हे दहाव्या स्थानावर आहेत. त्यांच्या कुटुंबियाची एकूण संपत्ती १०.५ बिलियन डॉलर एवढी आहे.