परदेशी कर्जात बुडालेल्या श्रीलंकेत महागाई अक्षरश: गगनाला भिडत आहे. परिस्थिती अशी आहे की खाण्यापिण्याच्या गोष्टीसह डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे या सर्व गोष्टीचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
मिरची ७०० रुपये तर टोमॅटो २०० रुपये किलो
श्रीलंकेत ब्रेड आणि दुध घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. तर आयातीवर निर्बंध लादले गेल्यामुळे दूध पावडर देखील मिळत नाही आहे. एक किलो मिरचीची किंमत तब्बल ७१० रुपये इतकी झाली आहे तर एक किलो टोमॅटोची किंमत २०० रुपये किलो इतकी झाली आहे. किरकोळ खाद्यपदार्थ्यांच्या किंमतीत गेल्या महिन्याभराच्या काळात तब्बल १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
आर्थिक आणीबाणी लागू
श्रीलंकेचे राष्ट्रपती असलेल्या गोटाबाया राजपक्षे यांनी मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात आर्थिक आणीबाणी लागू केली होती. त्यांनी लष्कराला जिम्मेदारी दिली होती की श्रीलंकेतील सर्व नागरिकांना किरकोळ सामान हे योग्य दरात देण्यात यावे.
गॅस सिलिंडर तब्बल २६०० रुपये
श्रीलंकेच्या राष्ट्रीय बॅंक म्हणजेच ‘सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका’ने जानेवारीमध्ये अधिकृत प्रतिक्रिया देऊन सांगितले होते की, मागील वर्षातील डिसेंबर २०२० च्या नंतर महागाई दर हा १२.०१ टक्के पर्यंत वाढला होता. हा दर नोव्हेंबर पर्यंत ९.५ टक्के झाला होता. श्रीलंकेतील खाण्याच्या वस्तूमध्ये मागील एका महिन्यात १५ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत ९० टक्के वाढ झाली आहे. १२.५ किलोग्रामचा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर हा १४०० रुपये होता तो आता वाढून २६५७ रुपये झाला आहे.
श्रीलंकेवर इतकी दिवाळखोरी येण्याचं नेमकं कारण काय?
श्रीलंका सरकारने चीनकडून तब्बल ७.३ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते. मात्र श्रीलंका सरकारला चीनचे हे कर्ज फेडता आले नाही. श्रीलंकेचा सर्वात मोठा आर्थिक कारभार हा पर्यटनावर चालत असतो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे तिथल्या पर्यटन व्यवस्थेस फटका बसला आहे. श्रीलंकेच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा १० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र तोच वाटा आता त्यांना मिळत नाहीये. बहुतांशी श्रीलंकन नागरिक हे रोजगारासाठी देशदेखील सोडून जात आहेत. त्यामुळे श्रीलंकेचे आयकर देखील कमी झाली आहे.
तांदूळ आणि साखर यासारख्या जीवनावश्यक वस्तू सरकारी दरात विकल्या जाव्यात यासाठी लष्कराला अधिकार देण्यात आल्या आहेत. पण त्यामुळे लोकांच्या अडचणी फारश्या दूर झालेल्या नाहीत. श्रीलंकेवर उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे सर्व राष्ट्रांनी व्यवहार करताना कोणती सावधगिरी बाळगावी हे या घटनेतून व्यवस्थित स्पष्ट होते.