आयकर विभागाच्या विशेष पथकाने सोमवारी सकाळी अन्नद्रमुख पक्षाचे आमदार आर. चंद्रशेखर यांच्या चालकाच्या घरावर छापा मारला. या छाप्यात आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागलंय. घरातील एका कपाटात विभागाला एक कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. चंद्रशेखर हे तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ड्रायवरचे नाव अलगरासामी असून मागच्या ९ वर्षांपासून ते आमदारांसोबत काम करत आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५०० रुपयांच्या नोटाच्या स्वरुपात ही रोकड आढळून आली आहे.
Tamil Nadu: Rs 1 Crore unaccounted cash recovered from the residence of Alagarsamy, the JCB driver of AIADMK MLA R Chandrasekar, in an Income Tax raid earlier today. The I-T raid was conducted at his residence in Trichy. pic.twitter.com/eCyj1PldHs
— ANI (@ANI) March 29, 2021
मनाप्पराई या विधानसभा मतदारसंघाचे २००८ पासून चंद्रशेखर प्रतिनिधित्व करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितले आहे. तामिळनाडू राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून विविध ठिकाणी रोकड जप्त करण्याच्या घटना घडत आहेत. आयकर आणि ईडी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपुर्वी मक्कल निधी मय्यम पक्षाच्या कोषाध्यक्षाच्या कार्यालय आणि घरातून ११.५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती.
तामिळनाडू राज्यातील २३४ विधानसभेच्या जागांवर ६ एप्रिलला मतदान पार पडणार आहे. तर २ मे रोजी निकाल लागणार आहे. एका टप्प्यात तामिळनाडूमधील निवडणूक पार पडेल.