Home ताज्या बातम्या महाराष्ट्रात येऊन टेस्ला कार बनवा; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांची एलॉन मस्कला ऑफर

महाराष्ट्रात येऊन टेस्ला कार बनवा; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांची एलॉन मस्कला ऑफर

392
0

एलॉन मस्क. एक सुप्रसिद्ध उद्योजक. त्यांच्या स्पेस एक्स या प्रोजेक्टसाठी ते जगभर प्रसिद्ध आहेत. तसेच आगामी टेस्ला या इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठीसुद्धा ते सध्या बहुचर्चित आहेत.

टेस्ला या कारचं आबालवृद्धांना आकर्षण आहे. हळूहळू जगभर या इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीचे प्लांट उभारण्याचा एलॉन मस्क यांचा मानस आहे. त्यांच्या याच परियोजनेतंर्गत ते भारतातही टेस्ला कारचा निर्मिती प्लांट उभारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

एलॉन मस्क हे स्वत: सुद्धा सोशल मीडियावर बरेच एक्टिव्ह असतात. आपल्या स्पेस एक्स, डॉजकॉईन आणि टेस्ला कार या प्रोजेक्टबद्दल ते वारंवार नागरिकांना माहिती देत असतात. १३ जानेवारी रोजी प्रणय पाठोले या युवकाने ट्विटरद्वारे एलॉन मस्क यांना प्रश्न विचारला की, बहुचर्चित टेस्ला कार भारतात केव्हा लाँच होणार? त्या ट्विटला रिप्लाय देताना एलॉन मस्क यांनी म्हटले की, सरकार द्वारे टेस्ला कारच्या विविध परवानग्यांबाबत आम्हाला खूप सारी आव्हाने येत आहेत.

एलॉन मस्क यांनी केलेले हे ट्विट गेल्या तीन दिवसांपासून भारतात खूप वायरल होत आहे. जगप्रसिद्ध उद्योजक असून सुद्धा एलॉन मस्क यांना भारतात टेस्ला कारचा निर्मितीप्लांट उभारायला एवढा त्रास का होत आहे? असा प्रश्न नागरिकांना पडलायं.

दरम्यान महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एलॉन मस्क यांना महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले आहे. एलॉन मस्क यांनी प्रणय पाठोले या युवकाला दिलेल्या रिप्लायला रिट्विट करत जयंत पाटील यांनी एलॉन मस्कला महाराष्ट्रात येण्यासाठी आवाहन केले आहे. महाराष्ट्र एक प्रगत राष्ट्र आहे आणि टेस्ला कारचे निर्मिती प्लांट उभारण्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल असेही त्यांनी म्हटले आहे.

एलॉन मस्क यांचे नेमके उद्दिष्ट काय ?

जर भारतात टेस्ला कारचा निर्मितीप्लांट उभा राहिला तर नागरिकांना टेस्ला कार परदेशातून मागवावी लागणार नाही, त्यामुळे त्यावरचे आयात शुल्क हे आपोआप माफ होईल. आयात शुल्क नसल्याने टेस्ला कारची विक्री किंमतसुद्धा नागरिकांना परवडण्याजोगी असू शकेल. एलॉन मस्क यांनी या आधीही सांगितले आहे की, भारताचे आयात शुल्क हे इतर देशांच्या तुलनेत खूप आहे. त्यामुळेच त्यांना भारतात टेस्ला कारचा निर्मिती प्लांट उभारायचा आहे.

तेलंगणाने ही एलॉन मस्कला आमंत्रित केले आहे.

तेलंगणाचे उद्योग मंत्री केटी रामा राव यांनी सुद्धा ट्विट करुन एलॉन मस्कला तेलंगणात टेस्ला कारचा प्लांट उभारण्यासाठी आमंत्रित केले आहे.

आता नेमका यावर काय तोडगा निघतो, टेस्लाचा प्लांट कोणत्या राज्यात उभा राहतो आणि नागरिकांना टेस्ला कार केव्हा उपलब्ध होईल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Previous articleबुक्कीत टेंगूळ देणारा टिकटॉक स्टार सूरज चव्हाण रुपेरी पडद्यावर झळकणार
Next article“लढेंगे और जितेंगे” नाऱ्याला आज पूर्णविराम लागला, प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे वृद्धापकाळात निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here