Home ताज्या बातम्या नवी मुंबई पोलीस दलात नोकरीची सुवर्ण संधी

नवी मुंबई पोलीस दलात नोकरीची सुवर्ण संधी

'या' पदासाठी होणार भरती, अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ जानेवारी

192
0

नवी मुंबई पोलीस दलात लवकरच भरती होणार असून याकरिता अधिसूचना नवी मुंबई पोलीस रिक्युमेंट २०२२ जारी केली आहे. विधी अधिकारी गट-ब आणि विधी अधिकारी गट -अ या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://www.navimumbaipolice.gov.in/ या लिंकवर क्लिक करावे. तसेच ऑफलाईन अर्ज पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व बँक समोर, सेक्टर 10, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई – 400614 या पत्तावर १४ जानेवारी २०२२ पर्यंत करता येईल.

विधी अधिकारी गट – ब (Legal Officer Group – B) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी पात्रता
– बारावी उत्तीर्ण
-उमेदवारांनी कायद्यात (Law)मध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक
– उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले असावे.
– मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे
-या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वकिलीचा किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

विधी अधिकारी गट – अ ( Legal Officer Group – A) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी पात्रता
– बारावी उत्तीर्ण
-उमेदवारांनी कायद्यात (Law)मध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक
– उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले असावे.
– मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे
– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वकिलीचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

मिळणारा पगार
विधी अधिकारी गट – ब – ३५ हजार प्रतिमहिना
विधी अधिकारी गट – अ – २८ हजार प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशील पुढील प्रमाणे
– दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो

Previous articleसावधान! बूस्टर डोसच्या नावाखाली होतेय फसवणूक.
Next articleआपल्या मुलांच्या कोविड लसीकरणासाठी असा करा स्लॉट बुक! COVID-19

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here