मध्य रेल्वेवर ७२ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक या आठवड्याच्या वीकेंडला घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची योग्य खबरदारी घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान हा मेगा ब्लॉक असणार आहे.
या मेगा ब्लॉक दरम्यान,३५० लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर, शंभरहून अधिक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ५ व्या मार्गिकेवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गिकेवर आणि ६ व्या मार्गिकेवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या ३ दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.
दिवा-वसई मेमु ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. तर सर्व फास्ट लोकल स्लो (धिम्या मार्गावर) ट्रॅकवर वळवण्यात येणार आहेत. या मेगा ब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यन्वित होईल, असे एमआरव्हीसीने माहिती दिली.