Home ताज्या बातम्या कर्नाटकातील हिजाब प्रकरणामुळे भारताची जगभरातील माध्यमांमध्ये नाचक्की

कर्नाटकातील हिजाब प्रकरणामुळे भारताची जगभरातील माध्यमांमध्ये नाचक्की

195
0

कर्नाटकमधील मुस्लिम मुलींच्या हिजाब पेहराव वादंगावरून सध्या देशाभरात चर्चा सुरु आहे. मंगळवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत होता, ज्यामध्ये हिजाब परिधान केलेली मुलगी असून तिचं नाव मुस्कान असल्याचे सांगितलं जातयं. सदर व्हिडीओमध्ये त्या मुलीला काही मुलांच्या टोळक्याने घेरलयं ज्यांनी भगवा शेला परिधान केला आहे. संबंधित मुलगी जेव्हा महाविद्यालयाच्या आवारात आपली दुचाकी पार्क करून इमारतीत जात असते तेव्हा सदर टोळका तिच्यासमोर ‘जय श्री राम’ च्या घोषणा करत आहेत.

सोशल मीडिया वर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे आणि त्यावर देशविदेशातून विशेषत: मुस्लिमबहुल देशांमधून खूपसाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तान व तुर्किसारख्या देशांत त्यांच्या प्रमुख वर्तमानपत्रातून या बातमीला विशेष जागा मिळाली आहे आणि त्यातून भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारवर थेट निशाणा साधण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या वर्तमानपत्रात काय छापून आलयं?

पाकिस्तानचं प्रमुख वर्तमान असलेल्या डॉन दैनिकात कर्नाटक हिजाब वादासंदर्भात एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. ज्यात लिहीण्यात आलयं की, नरेंद्र मोदींचे हिंदुत्ववादी सरकार मुस्लिमांचा व अल्पसंख्यांकांचा छळ करत आहेत व त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत.

पाकिस्तान टुडे या वर्तमानपत्रात सांगण्यात आलयं की, आरएसएसच्याच्या भगव्या गुंडांनी हिजाब घातलेल्या एका तरुणीला घेरलं, यातून हिंदुत्ववाद्यांची असूया दिसून येते.

एक्सप्रेस ट्रिब्यून म्हणतयं की, भगव्यासमोर राज्यांची सुरक्षायंत्रणा कमकुवत दिसून येत आहे. काही सत्तारूढ नेते हिजाब प्रतिबंधात सामिल आहेत. मोदी सरकार धार्मिक अल्पसंख्याक नागकरिकांच्या विरोधात षडयंत्र करत आहे.

पाकिस्तानी चॅनल जियो टिव्हीने तर एक रिपोर्ट प्रदर्शित केला, ज्यांच शीर्षक ठेवण्यात आलं होत – भारतात जय श्री राम घोषणा करणाऱ्या घोळक्याने मुस्लिम हिजाब पेहराव केलेल्या तरुणीला धमकावले.

पीटीवी न्यूजने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक प्रतिकात्मक फोटो अपलोड करुन सदर मुलीली प्रोत्साहन दिलयं.

तुर्किमध्ये नेमकं काय छापून आलयं

 

TRT WORLD ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलयं की, नरेंद्र मोदींचे सरकार मुस्लिमांच्या विरोधात हिंसेस प्रोत्साहन दिले आहे.

बांग्लादेशच्या वृत्तसंस्था काय सांगतायत?

बांग्लादेशच्या प्रमुख वर्तमानपत्र ढाका ट्रिब्यून ने सांगितलयं की. नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये हिजाब बंदीचे समर्थन केले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांकामध्ये भीतीचे वातावरण आहे.

हाँगकाँगमध्येही छापल्या गेल्या कर्नाटकच्या बातम्या

हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने लिहीलयं की, नरेंद्र मोदी सरकारने भारताचे धार्मिक ध्रुवीकरण केले आहे. भारताचे विरोधी पक्ष याला घाणेरडे राजकारण म्हणत आहेत.

Previous articleअपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला सोनू सूद धावला…
Next article“भगवा झेंडा हा भविष्यात भारताचा राष्ट्रध्वज बनेल” कर्नाटकचे मंत्री व भाजप नेते के. एस. ईश्वरप्पा यांच वादग्रस्त विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here