Home ताज्या बातम्या आवडीतून घडंल करिअर, गडचिरोलीचा वकिल शंख शिंपल्यांमधून कमवतोय लाखो रुपये

आवडीतून घडंल करिअर, गडचिरोलीचा वकिल शंख शिंपल्यांमधून कमवतोय लाखो रुपये

163
0
गडचिरोलीचा वकिल शंख शिंपल्यांमधून कमवतोय लाखो रुपये

प्रत्येक व्यक्तीला काही आवडीनिवडी तसेच एखाद्या गोष्टीचे आकर्षण असून शकते. मात्र हाच आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग होईल अशा तीव्र ईच्छा कोणीही बाळगलेली नसते. मात्र अशीच एक इच्छा गडचिरोली या अतिदुर्गम जिल्ह्यातील पारडी कुपी या गावातील तरुणाने सत्यात उतरवली आहे. लहानपणी मोत्याचे आकर्षण असलेल्या ३८ वर्षाच्या संजय गंडाटे या तरूणाने आपल्या वकीलीचे शिक्षण पूर्ण करूनही शेवटी आपल्या लहानपणाच्या आकर्षणामध्ये करीअर करण्याचा निर्णय घेतला.

एलएलबीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, काही वेगळ करण्याची त्यांची भुमिका अधिक खडतर आणि जोखमीची होती. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत नैसर्गिक पद्धतीने मोत्याची शेती करत आहे. संजय गंडाटे याने या शेतीबद्दलचा आपला अनुभव सांगतिला आहे, ही शेती करण्याची कोणतीही प्राथमिक माहीतीही त्यांना नव्हती. त्यासाठी गडचिरोलीतील कृषी महाविद्यालयाची मदत घेण्यासाठी गेले असता त्यांना फारशी माहीती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी मोत्याच्या शेतीची माहीती केवळ इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली. याच माहीतीच्या आधारे त्यांनी दोन वेळा शेती करण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले असे त्याने सांगितले.

या शेतीतून गुंतवणुकीच्या नऊ पट अधिक नफा मिळतो ही गोष्ट त्याने डोक्यात पक्की करून घेतली व आपल्या प्रयत्नात खंड पडू दिला नाही. पुन्हा प्रयत्न करून हाती यश मिळाले खरे मात्र हा आनंदही फार काळ टिकला नाही. या प्रयत्नात हाती आलेले मोती चोरीला गेले. त्या मोत्यांची किंमत आठ लाखांइतकी होती. पुन्हा या शेतीत यश मिळवून त्यांनी आपल्या कमाईची सुरूवात केली आहे. इतकेच नाही तर तो आता या मोत्याच्या शेतीबद्दल अनेकांना प्रशिक्षण देतो आहे.

१२०० रुपये प्रतिकॅरेट विकला जातो. साधारण एका शिंपल्यात दोन मोती असतात. त्याचा एकूण खर्च ७० रुपये इतका येतो. त्यातून तीन ते पाच हजारापर्यंत उत्पन्न मिळतं. एका हंगामात जवळपास पाच हजार शिंपले टँकमध्ये टाकले जातात. याचे योग्य नियोजन न झाल्यास शिंपल्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता असते. या व्यवसायात मोठी जोखीम देखील आहे. याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही असे संजयने सांगतिले आहे.

Previous articleअभिनेता सिद्धार्थने सायनावर केली अश्लील कमेंट, नेटीझन्स म्हणतात हा तर विकृत.
Next articleअवघ्या १८ महिन्यांच्या चिमुकलीनं सर केलं कळसुबाई शिखर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here