Home ताज्या बातम्या हिमालयातील युनाम शिखरावर ७५ ध्वजांचे तोरण लावून, मराठी गिर्यारोहकांनी साजरा केला ७५वा...

हिमालयातील युनाम शिखरावर ७५ ध्वजांचे तोरण लावून, मराठी गिर्यारोहकांनी साजरा केला ७५वा स्वातंत्र्यदिन

690
0
आपल्या अलग अंदाजाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे ध्येयातून वैभव ऐवळे या गिर्यारोहकाने रचला इतिहास

वैभव ऐवळ हा मराठी गिर्यारोहक स्वातंत्र्यदिन वेगळ्या स्टाइलने साजरा करतो. जितक्या वर्षांचा स्वातंत्र्यदिन तितक्या झेंड्यांचे तोरण जगातल्या उंच शिखरावर लावण्याचा वैभव ऐवळे यांचा दरवर्षीचा उपक्रम आहे. मुंबईच्या वैभव ऐवळे यांच्या नेतृत्वाखाली यंदा कु.मित्तल बोम्बे व सोलापूरचा बाळकृष्ण जाधव हा २५ वर्षांचा तरुण या तिघांनी हिमाचल प्रदेशातील माउंट युनाम (Yunam Peak) हे ६१११ मीटर उंचीचे (सुमारे २० हजार फुट) शिखर सर करून त्यावर ७५ ध्वजांचे तोरण लावून स्वातंत्र्यदिनाची मानवंदना दिली. या मोहिमेत त्यांच्यासोबत जयपूर राजस्थान येथून अमित चौहान, जय तिवारी, स्वेना कार्ला, प्रणव (मार्गदर्शक) व नागपूरच्या यामिनी बालप यांनी सहभाग घेतला.

वैभव ऐवळे, कु.मित्तल बोम्बे व सोलापूरचा बाळकृष्ण जाधव यांचा एकत्रित फोटो

 

वैभव ऐवळे यांनी २०१८ साली ७२ झेंड्यांचे तोरण स्वातंत्र्यदिनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माऊंट किलिमांजारो (५८९५ मीटर) येथे लावले. २०१९ साली ७३ ध्वजांचे तोरण युरोपातील (रशिया) माऊंट एल्ब्रस (५६४२ मीटर) या शिखरावर यशस्वी चढाई करून वैभव यांनी स्वातंत्र्यदिनी लावले. गतवर्षीच्या स्वातंत्र्यदिनी कोरोना संकट असताना खंड पडू न देता पनवेलच्या कलवंतीण दुर्ग सुळक्यावर यशस्वी चढाई करून ७४ ध्वजांचे तोरण त्यांनी फडकावले. यंदा मात्र सहा हजार मीटर्सपेक्षा अधिक उंचीचे शिखर गाठून ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे स्वप्न निर्धाराने पूर्ण करत ही मोहीम वैभव यांनी रक्षाबंधनानिमित्त देशातील सर्व भगिनींना समर्पित केली. या मोहिमेतून “Anti Rape Movement” या उपक्रमाला त्यांनी आपला पाठींबा दर्शवला.

वैभव ऐवळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत टिपलेली छायाचित्रे

 

 

त्यांच्या विक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (Asia Book Of Records), इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (India Book of Records) मध्ये झाली असून “Most numbers of Indian Flag hoisted on Mount Kilimanjaro & Mount Elbrus” असा विक्रम वैभव ऐवळे यांच्या नावे नोंदला गेला आहे.

आपल्या अलग अंदाजाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे ध्येयातून वैभव ऐवळे या गिर्यारोहकाने रचला इतिहास
Previous articleऑलिम्पिंकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदकं मिळवून देणारे मल्लं आजही सन्मानाच्या प्रतीक्षेत
Next articleकोकणच्या मातीत बंदिस्त शेळीपालनाचा अभिनव प्रयोग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here