देशाला चहुबाजूंनी सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय सैन्याचा मोठा वाटा आहे. आजवरच्या इतिहासात अनेक शौर्याची व स्फुर्तीची लढाई करून देशाच्या सैन्याने मोठा पराक्रम गाजवला आहे. यात महाराष्ट्राचा सहभागही तितकाच उल्लेखनीय आहे. भारतीय लष्कराच्या या गौरवशाली पराक्रमाची कामगिरी सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज एक मोठा निर्णय घेतला. मुंबई शहरात आधुनिक लष्करी संग्रहालय उभाण्याचे मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त या संग्रहालयाचे काम वेगाने पूर्ण करुन येणाऱ्या १५ ऑगस्टपर्यंत यातील काही भाग नागरिकांसाठी खुला करण्याची आपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला येथील समितीकक्षात लष्करी संग्रहालयाची बैठक पार पडली. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल एस.के. पराशर, ब्रिगेडियर डॉ. आचलेश शंकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधानसचिव भूषण गगराणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आई. एस.चहल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
संग्रहालयाचे आकर्षण काय असेल
मुंबई शहरात पर्यटनासाठी अनेक भागातून लोक येतात. या नागरिकांना पर्यटनासोबत देशाच्या लष्कराची ओळख करुन देणारा हा प्रकल्प मानावा लागेल. ज्यामध्ये पुढीलप्रमाणे रचना करण्यात येणार आहे.
* देशाच्या तीनही सैन्य दलाच्या पराक्रमाच्या यशोगाथा, विविध युद्धांची माहिती
* तीनही सैन्य दलात सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील सैनिक व अधिकाऱ्यांची माहिती
* युद्धात वापरण्यात आलेले टँक, नौका, विमाने, पदके, लष्करी गणवेश अशा सर्व गोष्टी प्रदर्शित केल्या जातील.
* छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदल नियोजनाचे दालन उभारण्यात येईल.
* भारतीय स्वातंत्र्याची सर्व ऐतिहासिक माहिती या संग्रहालयात मिळेल.
केवळ पर्यटन नाही तर युवकांना लष्कराप्रती प्रेरणा मिळण्याचा प्रयत्न
राज्यातील हे लष्कर संग्रहालय केवळ पर्यटनाचे साधन म्हणून न पाहता यातून नव्या पिढीला प्ररेणा मिळावी यासाठी अनेक गोष्टींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
* काही गोष्टींची अनुभूती घेण्यासाठी बंकर, सियाचीनसारखी उणे डिग्री सेल्सीयसचे ठिकाणे, जड शस्त्रास्त्रे अशा गोष्टी उभारण्यात येतील.
* एक अॅक्टीव्हिटी विभाग तयार करुन यामध्ये युवावर्गाला शारीरीक सुदृढतेसाठी काय करावे, सुरक्षततेसाठीचे मार्गदर्शन दिले जाईल.
* भारतीय लष्करात सहभागी होण्यासाठी करायवयाची तयारी, प्रात्यक्षिक ज्ञान देणारे कोर्सेस येथे राबविण्यात येतील.
भारतीय लष्कराची माहिती मिळताना या संग्रहालयाच्या माध्यमातून नागरिकांना एक समृद्ध असा अनुभव मिळेल अशी व्यवस्था ही याठिकाणी करण्यात येणार आहे.