आपीएलमध्ये पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्स टिमचा खूप मोठा फॅनक्लब आहे. मुंबई इंडियन्स मैदानावरील आपल्या कामगिरीने त्यांच्या फॅन्सची मन जिंकत असतात. मैदानावर सर्वांचे मनोरंजन करण्याबरोबर या खेळाडूंना मैदानाबाहेर त्यांच्या फॅन्सचे मनोरंजन कसे करायचे हेही माहित आहे. आयपीएलच्या नव्या पर्वाला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. सर्वच टिमची यासाठी तयार करत आहेत. अशातच मुंबई इंडियन्स टिमचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबईचे सर्व खेळाडू सध्या सोशल मिडियावर ट्रेडिंग असणाऱ्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सध्या सोशल मिडियावर अतिशय गाजलेलं गाणं म्हणजे ”एक नारळ दिलाय दर्या देवाला”. या गाण्याने संपूर्ण सोशल मिडियाला वेड लावलं आहे. आता या सुप्रसिद्ध आगरी गाण्यावर मुंबई इंडियन्स टिमचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, पंड्या बंधू थिरकताना दिसत आहेत. त्यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल होतोय. व्हिडिओला सोशल मीडियावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिसाद देत आहेत. खरं तर या व्हिडिओमध्ये खेळाडू त्यांच्या पद्धतीने डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओतील गाणे आणि त्यांचा डान्स वेगळा असल्याचे दिसून येते. मुंबई इंडियन्स टिमने सोशल मिडियावर हा व्हिडिओ अपलोड करताना तुम्हाला सर्वांत जास्त कोणाचा डान्स आवडला? असा प्रश्न विचारला आहे.
आपीएलमध्ये सर्वांत जास्त ट्रॉफी जिंकण्यामध्ये मुंबई इंडियन्स हि टिम आघाडीवर आहे. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणून या टिमने किताब मिळवला आहे. रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्स २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२० या वर्षी आयपीएलचे सामने जिंकून पाच वेळा चॅम्पियन बनले आहेत.