भारताची फुलराणी व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालच्या ट्विटला रिप्लाय देताना रंग दे बसंती फेम अभिनेता सिद्धार्थने मर्यादा सोडून अत्यंत वादग्रस्त ट्विट केले आहे. सिद्धार्थने सायनाच्या ट्विटला लैंगिक अंगाने जाणारी अत्यंत घाणेरड्या भाषेतील कमेंट केली आहे. त्यामुळे नेटीझन्स त्याला चांगलेच धारेवर धरलयं.
या सर्व वादाची पार्श्वभूमी अशी की, पाच जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये चूक झाली होती. त्यावरुन सायनाने एक ट्विट केलं होतं. काही आंदोलकांनी मार्ग रोखून धरला होता, त्यामुळे मोदींचा सुरक्षा ताफा १५ ते २० मिनिटं पुलावर अडकून पडला. सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्याने पंतप्रधानांचे पुढचे सर्वही कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यावरुन बरेच वाद सुद्धा झाले होते. सायनानेही यावर एक ट्विट केले होते.
“स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड होत असेल, तर कुठलाही देश आपण सुरक्षित आहोत, असा दावा करु शकत नाही. मी कठोर शब्दात या घटनेचा निषेध करते” असे सायनाने त्या ट्विटमध्ये म्हटले होते.
अभिनेता सिद्धार्थने सायनाच्या या ट्विटला रिट्विट करुन लैंगिक अंगाने जाणारा अश्लील रिप्लाय दिला आहे.
Subtle cock champion of the world… Thank God we have protectors of India. 🙏🏽
Shame on you #Rihanna https://t.co/FpIJjl1Gxz
— Siddharth (@Actor_Siddharth) January 6, 2022
सिद्धार्थच्या या ट्विटवर नेटीझन्स चांगलेच भडकले आहेत. अनेकांनी सिद्धार्थला स्त्रीद्वेषी देखील ठरवलं आहे. देशाला गौरवान्वित करणाऱ्या महिलेबद्दल सिद्धार्थचे हे वर्तन हे रस्त्यावरच्या एखाद्या टपोरी मुलासारखे असल्याचे म्हटले जात आहे. एका युजरने तर अशा नमुन्यांना आई-वडिल कसं मोठ करतात? असा प्रश्न उपस्थित केला आहे. काहीनी तर विचारलं कोण सिद्धार्थ ? तर काहींनी म्हटलयं सिद्धार्थ हा एक फ्लॉप अभिनेता आहे. फक्त आणि फक्त रंग दे बसंतीमुळे त्याची ओळख आहे.
आपण केलेल्या ट्विटमुळे बराच वाद होत असल्याचे निदर्शनास आल्यावर, सिद्धार्थने आज (१० जानेवारी २०२२ रोजी) दुपारी दिड वाजता एक नवे ट्विट करुन त्या ट्विट मागचं स्पष्टीकरण दिले आहे.
"COCK & BULL"
That's the reference. Reading otherwise is unfair and leading!
Nothing disrespectful was intended, said or insinuated. Period. 🙏🏽
— Siddharth (@Actor_Siddharth) January 10, 2022
दरम्यान नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा या ट्विटसाठी सिद्धार्थचे ट्विटर खाते डिलीट करायची मागणी ट्विटरकडे केली आहे.