राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. मुंबईच्या किमान तापमानामध्येही घट होण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. गेले दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात आणि मुंबईमध्ये थंडीने उसंत घेतली होती. परंतु पुढील २४ तासात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
31 Jan,
Next 7 days forecast for Nashik, Pune, Jalgaon, Mumbai by IMD…
There could be drop in min temperature possibly from 2 or 3 day onwards …
Pl see IMD website for all city's forecast in the country..
Watch for IMD updates pl. pic.twitter.com/AS1noSiWDK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 31, 2022
राज्यातील ग्रामीण भागात थंडीने कहर केला. राज्यातील बहुतांश भागात गोठणारी थंडी होती. रविवारी राज्यात अनेक ठिकाणी किमान तामपान १० अंशाखाली नोंदवण्यात आले. नाशिक येथे ९.८ , मालेगाव ८.४ , जळगाव ७.२, अहमदनगर ७.६ अंश सेल्सिअस होते.
येत्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान आणि कमाल तापमानात घट होणार आहे. त्यामुळे रात्री बरोबर दिवसाही वातावरणात गारवा राहणार आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
पुढील दोन -तीन दिवसामध्ये नाशिक, पुणे, जळगाव आणि मुंबईच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिली. त्यामुळे मुंबईमध्ये गारेगार वारे पुन्हा वाहणार आहेत. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे.