कोरोना संक्रमणाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत स्व:रक्षणासाठी, मास्कच सर्वात जास्त सुरक्षित असल्याचं शास्त्रज्ञांमार्फत सांगितले जात होते. आता ओमायक्रॉनचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर पुन्हा एकदा मास्क कटाक्षाने वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र ओमायक्रॉनपासून बचावासाठी नक्की कोणता मास्क परिधान करावा, या जाणून घेऊयात…
दक्षिण आफ्रिकेत उगम पावलेल्या ओमायक्रॉनला (Omicron) संपूर्ण जगात पसरण्यासाठी जास्त वेळ नाही लागला. अवघ्या दोन महिन्यात या नव्या व्हायरसमुळे साऱ्या जगामध्ये रूग्णांचा विस्फोट झाला. हा व्हायरस त्या लोकानांही होतो ज्यांनी व्हॅक्सिनचे दोन्ही घेतले आहेत आणि जे या आधीही कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत. ओमायक्रॉनचा प्रसार फार तेजीने होत असून शास्त्रज्ञांनी या व्हायरसला फार गंभीरतेने घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉनचा प्रसार ७० टक्क्यांनी अधिक आहे आणि तो मानवी शरीराच्या फुफ्फुसांवर नव्हे तर घशावर आक्रमण करतो.
यासाठी सर्वांनीच आपण घातलेला मास्क व त्याच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. आपण घातलेला मास्क हा स्वच्छ आहे की नाही हे पाहून घ्या. तो स्वच्छ नसल्यास तो स्वच्छ करण्याची काळजी घ्या.
ओमायक्रॉनपासून बचावासाठी नक्की कसा मास्क वापरावा ?
ऑक्टोबर २०२१ मध्ये सेंट्रल फॉर डिझिज कंट्रोल एण्ड प्रीवेन्शन(सीडीसी) बोर्डातर्फे मास्कसंदर्भात एक नियमावली जाहिर केली गेली होती. ज्यामते, कमीत कमी २ लेयरचा मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच मास्क वापरताना नाक, तोंड व हनुवटी पूर्णत: झाकलेली असावी. शास्त्रज्ञांच्या मते, कपड्याचे मास्क हे अत्यंत कमी दर्जाचे आहेत. ते फक्त हवेच्या प्रवाहाला रोखू शकतात. कपड्याच्या मास्कद्वारे ७५ टक्के व्हायरस आत जाऊ शकतात.
सीडीसी च्या अनुसार, एन ९५ मास्क हा हवेचे धूलीकण रोखण्याकरता ९५ टक्के प्रभावशील आहे. तर सर्जिकल मास्क फक्त आणि फक्त ५ ते १० टक्के आणि कपड्याचे मास्क ५० टक्के प्रभावशील आहे. त्यामुळे ओमायक्रॉनला रोखण्यासाठी एन ९५ मास्क अत्यंत गुणकारी आहे.
एन ९५ मास्कला तुम्हाला फिल्टरिंग फेसपीस मास्कचा पर्याय उपलब्ध आहे. फिल्टरिंग फेसपीस मास्कचा साधारणत: प्रयोगशाळा अथवा कारखान्यांमधून केला जातो. एन ९५ इतकाच फिल्टरिंग फेसपीस मास्कसुद्धा ९५ टक्के प्रभावशील आहे.
त्यामुळे तुम्हीसुद्धा कामानिमित्त घराबाहेर पडताना शक्य असल्यास एन ९५ मास्कचा अथवा फिल्टरिंग फेसपीस मास्कचा वापर करा.