Home ताज्या बातम्या शेवटी चायना मालच तो; चीनची लस घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान कोरोना पॉझिटिव्ह

शेवटी चायना मालच तो; चीनची लस घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान कोरोना पॉझिटिव्ह

गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीन निर्मित 'सिनोफर्म' या लसीचा डोस घेतला होता. मात्र आज शनिवारी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला.

262
0
Pakistan pm imran khan takes vaccine
दोनच दिवसापुर्वी इम्रान खान यांनी कोरोनाची लस घेतली होती.

कोरोनाची उत्पत्ती चीनमधून झाली, यावर वर्ष २०२० मध्ये अनेक वादंग उठले होते. शेवटी याचा तपास काही लागला नाही. त्यानंतर जगातील सर्व देश वाद मागे ठेवून कोरोनाची लस शोधण्याच्या कामाला लागले. चीनने देखील आपली स्वतःची लस शोधून काढली आहे. हीच लस दोन दिवसांपुर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली होती. मात्र आज त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चीनची लस ही इतर सामानांप्रमाणेच ‘चायना माल’ निघाल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत.

इम्रान खान यांच्या कार्यालयाकडून ते पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी इम्रान खान यांनी चीन निर्मित ‘सिनोफर्म’ या लसीचा डोस घेतला होता. लस घेतानाचा व्हिडिओ आणि फोटो पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जगभरातील इतर देशांप्रमाणे पाकिस्तानातही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ६ लाख २३ हजार १३५ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तर १३ हजार ७९९ मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत.

Previous articleदहावी आणि बारावीची परीक्षा होणार ऑफलाईन
Next articleपॉर्न पाहण्याच्या सवयीतून १२ वर्षीय मुलाने बहिणीसोबतच केलं गैरकृत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here