Home ताज्या बातम्या आता इंटरनेटशिवाय करा Paytmचं पेमेंट, पेटीएमने इंटरनेटविना पेमेंट करणारे फिचर लाँच...

आता इंटरनेटशिवाय करा Paytmचं पेमेंट, पेटीएमने इंटरनेटविना पेमेंट करणारे फिचर लाँच केलं

353
0
Paytm ने टॅप टू पे हे नवं फिचर बाजारात आणलय

सध्या प्रत्येक घटकात ऑनलाईन पेमेंट प्रक्रीया केली जाते. यासाठी नवनेव ॲप उपलब्ध आहेत. यापैकीच एक Paytm ॲप सर्रास वापरले जाते. पेमेंट करण्यची प्रक्रीया ही इंटरनेटशिवाय होऊ शकत नाही. मात्र पेटीएम कंपनीने आता या ॲपच्या वापरात बदल करून इंटरनेटविना पेमेंट करण्याचे नवं फिचर बाजारात आणलं आहे. इंटरनेट नसतानाही पेटीएमधारकांना थेट पेमेंट करण्याचा पर्याय खुला झाला आहे.

Paytmने आपल्या ॲपमध्ये टॅप टू पे हे नवं फिचर आणल आहे. याचा वापर करून आपण ॲप ओपन न करताच पेमेंट करू शकतो. पीओएस मशीनवर फोन टॅप करून आपले पेमेंट करता येणार आहे. हे फिचर सध्या केवळ अँडड्रॉईड मोबाईल धारकांनासाठी उपलब्ध आहे. आयोओएस यूजर्स या फिचरचा वापर करू शकणार नाही. NFC सपोर्टेड टॅप टू पे फिचर आयफोन युजर्स केवळ ॲपल पेच्या माध्यामातून करू शकतात. मात्र हे अजून भारतात उपलब्ध नाही. हे फिचर तुम्ही कसे वापरू शकता याची सविस्तर माहीती जाणून घ्या.

यासाठी सर्वप्रथम पेटीएम ॲप चालू करण्याआधी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप अपडेटेड करून घ्यावे लागेल.

यातूनच टॅप टू पे ही फिचर वापरू शकता. ॲप ओपन केल्यानंतर टॅप टू पे हा ऑप्शन सिलेक्ट करा.

पुढे Add New Card चा ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुम्ही कार्ड पहिले सेव्ह केले असेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता.

या कार्डला सिलेक्ट करून हे फिचर अक्टीव्ह करू शकता.

यानतंर Proceed to Verify Card वर टॅप करा. यात तुम्हाला वन टाईम पासवर्ड मिळेल. यानंतर पासवर्ड टाकल्यानतंर टॅप टू पे फिचर पूर्णपणे ॲक्टीवेट होईल.

हे फिचर वापरण्यसाठी तुमच्या फोनमध्ये NFC सक्रीय असणे गरजेचे आहे. तसेच या फिचरमध्ये ट्रान्सफरवर ५००० रूपयांपर्यंतची मर्यादा आहे. पाच हजार रुपयांच्या वरील व्यवहार असल्यास POS मशीनवर पीन टाकावा लागेल.

Previous articleमध्य रेल्वेवर तीन दिवस जम्बो मेगा ब्लॉक
Next articleभारताकडून हिवाळी ऑलिम्पिकसाठी एकच खेळाडू रवाना. कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here