Home क्राईम वडाळा स्थानकातील व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील धक्कादायक सत्य

वडाळा स्थानकातील व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील धक्कादायक सत्य

468
0
वडाळा स्थानकातील व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील धक्कादायक सत्य

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक महिला पोलीस शिपाई एका व्यक्तिला वडाळा रेल्वे स्थानकात जबर मारहाण केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत होते. सोबत कॅप्शन लिहीली होती की, “तिकीट आणि आयडी नाही‌ म्हणून महिला पोलिसाची‌ मुलीला मारहाण..” आता जी व्यक्ती मार खातेय ती नक्की मुलगी आहे का मुलगा? हे समजून घेण्यासाठीच अनेक लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला. तसेच सध्या सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची बंदी आहे. त्यामुळे अनेकजण विदाऊट तिकीट प्रवास करत आहेत. अशापैकीच एकाला मारहाण झाल्याचे सांगूनही हा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र अखेर या व्हिडिओमागचे सत्य समोर आले आहे. जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती.

https://fb.watch/v/KbRk306m/

सर्वात आधी एक स्पष्ट करुया जी व्यक्ती मार खातेय ती मुलगी नसून मुलगा आहे. हा मुलगा नशेखोर असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊनमुळे कामावर जाणाऱ्यांना लोकलमध्ये परवानगी नाही. मात्र नशेखोरांना कोणत्याही परवानगीची गरज नसते. त्यामुळे हा गडी लोकमध्येच नशापाणी करत होता. ही घटना १० जुलै रोजीची आहे. शिवडी स्थानकाकडून वडाळाच्या दिशेने लोकल निघाली होती. यावेळी जनरल डब्यात अक्रम हमीद खान नावाचा २० वर्षीय तरुण सोल्यूशनची नशा करत होता. याच डब्यात महिला पोलीस शिपाई गावकर देखील होत्या. त्यांनी या नशेखोर तरुणाला नशापान करण्यापासून रोखत त्याच्याकडे अत्यावश्यक सेवेचा आयडी असल्याची विचारणा केली.

गावकर आपले कर्तव्यच पार पाडत होत्या. मात्र नशेखोराने आरडाओरड करत अश्लील शिविगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे गावकर यांनी वडाळा जीआरपीला याबाबत माहिती दिली. जीआरपीने सदर तरुणाला वडाळा स्थानकात उतरवले. यावेळी त्याला जाब विचारला असताना त्याने पुन्हा उद्धट वर्तन केले. त्यामुळे महिला पोलीस शिपाई गावकर यांनी सदर तरुणाला चोप देऊन त्याला धडा शिकवला. त्याचवेळी पलीकडच्या बाजूने जाणाऱ्या ट्रेनमधील एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला. हाच व्हिडिओ नंतर प्रचंड व्हायरल झाला.

Previous articleपावसाळी पिकनिक काढताना थोडं सबुरीनं घ्या, लोणावळ्यात पर्यटकांवर शासनाची करडी नजर
Next articleकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या आयुष्यातील पोकळी ‘राष्ट्रवादी जीवलग’ भरुन काढणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here