सरकारी नोकरी मिळणं हे अनेकांचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी लोक अतोनात प्रयत्न करतात. रेल्वे भरती मंडळाने अशा सर्व इच्छुकांना खुषखबर आणली आहे. पश्चिम मध्य रेल्वेत इंटर्नशिप करू इच्छिणाऱ्यांसाठी ६८० पदांची भरती रेल्वेने जारी केली आहे. या पदभरतीसाठी शैक्षणिक पत्रता ही १० वी पास अशी ठेवण्यात आली आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज करू शकतात. हा अर्ज भरण्यासाठी ५ एप्रिल ही शेवटची तारीख असून यापुढे अर्ज स्विकारला जाणार नाही. अर्ज भरण्यासाठीची इतर सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे…
शैक्षणिक पात्रता
इंटर्नशिप करणाऱ्या उमेदवारांला ५० टक्के गुणांसह दहावीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांना एनसीव्हीटी / एससीव्हीटीद्वारे मान्यता प्राप्त संस्थेशी संबंधित असणाऱ्या ट्रेडमध्ये आयटीआय पास असणे देखील आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा १५ ते २२ वर्षे आहे. तर प्री-आयटी, एमएलटी फ्रेशर्ससाठी वयोमर्यादा २४ वर्षांपर्यंत आहे. दरम्यान, आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय निकषांनुसार जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत मिळणार आहे.
अर्ज फी
सामान्य / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्जासाठी भरावे लागणार आहे. आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्जासाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही
निवड प्रक्रिया
दहावी आणि आयटीआय परीक्षेत सरासरी गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. फ्रेशर्ससाठी एसएसएलसी / मॅट्रिकमधील उमेदवारांकडून मिळवलेल्या सरासरी गुणांच्या आधारे ही निवड केली जाणार आहे.