Home ताज्या बातम्या JOB Alert: रिझर्व्ह बँकेत ९५० पदांसाठी भरती, ही सुवर्णसंधी चुकवू नका!

JOB Alert: रिझर्व्ह बँकेत ९५० पदांसाठी भरती, ही सुवर्णसंधी चुकवू नका!

233
0

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असिस्टंट या पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आरबीआयमध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आरबीआयमध्ये असिस्टंट पदाच्या ९५० जागांसाठी भरती करण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सुरु होणार आहे.आरबीआयच्या वेबसाईटवर भेट देऊन इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्यास १७ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. निवड झालेल्या उमदेवारांना देशातील विविध शहरांमध्ये रुजू व्हावं लागेल. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार असिस्टंट या पदासाठी अर्ज दाखल करायचा असल्यास तो ऑनलाईन पद्धतीनं सादर करावा लागेल. rbi.org.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याची सुविधा १७ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. तर, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही ८ मार्च आहे. आरबीआयकडून या पदांसाठी परीक्षा २६ व २७ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.

परिक्षेसाठी पात्रता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारानं भारत सरकारतर्फे मान्यता असणाऱ्या कोणत्याही विद्यापीठातून ५० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. एसटी, एससी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केवळ उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. २१ ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

निवड प्रक्रिया

आरबीआयद्वारे असिस्टंट या पदावर उमदेवारांची नियुक्ती करण्यासाठी दोन परीक्षा घेण्यात येतील. त्यानंतर भाषा क्षमता चाचणी घेण्यात येईल, त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्जाचं शुल्क

पात्र उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर 8 मार्चपर्यंत अर्ज सादर करु शकतात. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर माहितीसाठी स्वत:कडे प्रिंटआऊट सोबत ठेवावी. या परीक्षेचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं जमा करायला लागणार आहे. ४५० रुपये शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येतील.

Previous articleGangubai: माझ्या समाजसेवी आईला वैश्या बनवलं, गंगूबाईच्या कुटुंबियांकडून सिनेमावर आरोप.
Next articleUP Election: प्रयागराजला हवेतून उडणाऱ्या बस आणू, माझ्याकडे पैश्याची कमी नाही. – नितीन गडकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here