प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्ररथा’चा पुरस्कार मिळाला आहे, तर उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर चित्ररथ तयार करण्यात आला होता. सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
Indian Navy chosen as best marching contingent among the Services during Republic Day parade 2022; Indian Air Force wins in popular choice category; Ministry of Education & Ministry of Civil Aviation declared joint winners among Ministries: Defence Ministry pic.twitter.com/ZTlT16nkMZ
— ANI (@ANI) February 4, 2022
त्याचप्रमाणे भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळालाय. तर याच गटामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरवण्यात आले आहे. मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना पुरस्कार विभागून देण्यात आला.
महाराष्ट्राने ‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित हा चित्ररथ तयार केला होता. चित्ररथारवर कास पठार दाखवण्यात आले होते. त्यावर राज्यातील वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होता. सुमारे १५ प्राणी आणि २२ वनस्पती आणि फुले या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. झाडे लावू झाडे जगवा असा संदेश चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात आला. महाराष्ट्राचा चित्ररथ नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या तरूणांनी तयार केला होता. या चित्ररथाला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आणि सहसंचालक मीनाक्षी जोगळेकर यांनी या चित्ररथाची संकल्पना मांडली होती.