Home ताज्या बातम्या वाढत्या इंधन दरवाढीतही हमखास वाचवा ४०० रुपये, ही युक्ती नक्कीच कामी येणार!

वाढत्या इंधन दरवाढीतही हमखास वाचवा ४०० रुपये, ही युक्ती नक्कीच कामी येणार!

349
0
इंधन दरवाढीतही आता वाचणार ४०० रूपये

देशात पेट्रोल- डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सामान्य जनता या वाढत्या महागाईला चांगलीच वैतागली आहे. खाण्यापासून ते प्रवासापर्यंत प्रत्येक गोष्टीत घराच बजेट कोलमडून जातयं. यामुळे आता एक युक्ती तज्ज्ञांनी समोर आणली आहे. यातून तुमच्या खिशाला लागणारी कातरं बऱ्याच अंशी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. दररोजच्या वापरात असलेली गाडी आता खिशाला परवडत नाही अशी लोकांची मनस्थिती झाली आहे. पैसे कुठे बचत करायचे आणि कुठे खर्च करायचे याचा ताळमेळ लोकांना बसत नाही. या महागाईत इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय उपलब्ध असला तरी तो अत्यंत महागडा पर्याय आहे. तसेच पेट्रोल- डिझेलची गाडी विकण्याचा निर्णय घेतला तरी या महागाईत गाडी विकूनही हवा तेवढा नफा मिळणे कठीण आहे.

या सर्व महागाईच्या झळा कमी करण्यासाठी लोकांना आता तज्ज्ञांचा लाखमोलाचा सल्ला नक्की कामी येईल. वाढत्या महागाईतही ४०० रुपये हमखास वाचण्याची चिन्हे यातून दिसू लागली आहेत. गाडीधारकांसाठी काय आहे हा पर्याय तो समजून घ्या. देशात मागील १५ दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत १३ वेळा वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल ११९.६७ रुपये तर डिझेल १०३.०७ रुपये प्रति लीटर इतके झाले आहे. ८४, ८४, ८४, ८४, ५२, ३३, ८४, ८४, ८४, ८४, ८४, ४३, आणि ८४ पैशांनी जवळपास १० रुपयांनी वाढले आहे. या दरवाढीचा वेग आणि इंधन कंपन्यांचे नुकसान पाहता पुढील काळात हे दर अजून १० ते १२ रुपयांनी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आपल्या गाडीचा फ्युअल टँक पूर्ण भरण्याचा पर्याय अत्यंत प्रभावी ठरू शकतो.

चारचाकी गाड्यांना साधारणत: ३० ते ३५ लीटरचे फ्युअल टँकची क्षमता असते. त्यामुळे ज्यांनी या दरवाढीच्या सुरुवातीला आपल्या गाडीच्या टाक्या फुल केल्या आहेत त्यांचे आजवरचे महागलेले १० दिवसांचे पैसे वाचले आहेत. यातूनच त्यांना ४०० रुपयांपर्यंतचा फायदा मिळाला आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील काळात हे दर अधिक वाढले तर ज्यांनी आपल्या गाड्यांच्या टाकी पूर्ण भरल्या असतील त्यांना हा फायदा होऊ शकेल. तसेच ज्यांनी दरवाढ सुरु होण्यापूर्वीच आपल्या गाडीचे फ्युअल टँक पूर्ण भरले असतील तर त्यांनी आजपर्यंतचे ७०० ते ८०० रुपये वाचविले असतील.

Previous articleJob Alert : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, इथे करा अर्ज…
Next articleCID मध्ये काम करायची इच्छा? इथे करा अर्ज…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here