Home क्राईम नवाब मलिकांमुळे समीर वानखेडेंचा करेक्ट कार्यक्रम; NCBचा कार्यकाळ संपला.

नवाब मलिकांमुळे समीर वानखेडेंचा करेक्ट कार्यक्रम; NCBचा कार्यकाळ संपला.

243
1
नवाब मलिक यांच्या पोलखोलीतून झाली समीर वानखेडेंची उचलबांगडी

एनसीबीचे महाराष्ट्र झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे आपल्या ड्रग्ज कारवाईत अनेकदा चर्चेत आले आहेत. IRS ऑफिस असेलेल्या समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांची अनेक दिवसांपासून करडी नजर होती. समीर वानखेडेंच्या झोनल डायरेक्टरचा कार्यकाळ पूर्ण होऊन त्यांना याआधी चार महिन्याचे एक्सटेंशन देण्यात आले होते. या एक्सटेंशनची पुनरावृत्ती होईल अशा चर्चा रंगत असतानाच, त्यांचा एक्सटेंशनला एनसीबीकडून नकार देण्यात आला आहे. समीर वानखेडे यांची कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला आहे. आता वानखेडे यांचा NCB मधील कार्यकाळ संपल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

समीर वानखेडेंच्या अनेक कथित घोटाळ्याची पोलखोल नवाब मलिक यांनी केली होती. यामध्ये त्यांच्या अंदाधुंद कारवाई, त्यांनी दिलेल्या खोट्या जात प्रमाणपत्राचा तसेच दुसऱ्या लग्नात लपवलेल्या सर्व गोष्टींचा खुलासा मलिक यांनी केला आहे. परिणामी समीर वानखेडेंची NCBमधून उचलबांगडी केल्याची चर्चा होत आहे.

समीर वानखेडे कोण आहे ?

समीर वानखेडे हे २००८ साली आयआरएस अधिकारी म्हणून नियुक्त झाले. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्या नतंर त्यांची पहीली पोस्टिंग ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर डेप्युटी कस्टम कमिश्नर या पदावर झाली. त्यानतंर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश त्यानतंर दिल्ली येथे पाठवण्यात आले. अमली पदार्थ आणि ड्रग्जच्याबाबतीत समीर वानखेडे यांना अधिक हातखंडा असल्याचे मानले जाते.

Previous articleआपल्या मुलांच्या कोविड लसीकरणासाठी असा करा स्लॉट बुक! COVID-19
Next articleतयार रहा, आता ‘फ्लुरोना’ येतोय !

1 COMMENT

  1. Why don’t you guys also post about the developments in the court proceedings in the case Samir wankhede’s family has filed against the minister?
    That shall help us to know if the accusations made against the officer were really true and those have affected the extension of officer at NCB

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here