लग्न करून आपला राजा-राणीचा संसार थाटण्याची उत्सुकता सगळ्यांना असते. परंतू मध्यप्रदेश येथील एक तरूणाचे नशीब इतके दुर्दैवी आहे की लग्नानंतर त्याच्या पत्नीविरोधात फसवणुकीचा दावा घेऊन त्याला सुप्रिम कोर्टात धाव घ्यावी लागली आहे. या प्रकरणात सीक्रेट गेम या नेटफ्लिक्सच्या हिंदी वेब सीरीजची हुबेहूब घटना घडली आहे. या वेबसिरीजमध्ये प्रमुख पात्र असलेल्या गायतोंडे भाऊला आवडणारी कुक्कू जेव्हा तिच्या अस्तित्वाचा खुलासा करते तेव्हा गायतोंडे भाऊची झोपच उडून जाते. मध्यप्रदेशमधील त्या तरूणाने लग्न करून घरी आणलेल्या आपल्या पत्नीचा असाच प्रकार जेव्हा पाहीला तेव्हा त्याने या फसवणुकीविरोधात पोलिस ठाण्यात पत्नी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार केली.
काय आहे प्रकरण?
तरूणाने ज्या मुलीसोबत लग्न केले तिला इम्परफोरेट हायमेन (imperforate hymen) हा विकार आहे. ज्यामध्ये हायमेन योनीमार्गात पूर्णपणे अडथळा निर्माण करतो. तसेच त्याच्या पत्नीला पुरूषांप्रमाणे जननेंद्रीय आहे असा दावा तरूणाने केला आहे. त्यामुळे ही स्पष्टपणे फसवणूक आहे याची कारवाई व्हावी अशी मागणी त्याने कोर्टात केली आहे.
पत्नीवर फौजदारी खटला चालावा अशी मागणी करणाऱ्या तरूणाच्या याचिकेची तपासणी करण्यास सुप्रिम कोर्टाच्या न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने सुरुवातीला नापसंती दर्शवली होती. मात्र वैद्यकीय अहवाल कोर्टात सादर झाल्यानंतर कोर्टाने पत्नीकडून याचे उत्तर मागितले आहे.
याचिकाकर्त्या तरूणाने याप्रकरणात माझी फसवणुक झाल्याबद्दल आणि त्याचे आयुष्य उद्वस्त केल्याबद्दल पत्नीवर कायदेशीर गुन्हे दाखल करून शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यानुसार आता खंडपीठाने पत्नी, तिचे वडील आणि मध्यप्रदेश पोलिसांना सहा आठवड्यात संबंधित घटनेचा सविस्तर उत्तर देण्याची नोटीस पाठवली आहे.
तर दुसरीकडे पत्नीने तिच्या पतीविरोधात अतिरिक्त हुंड्याची मागणी करून तिच्याशी क्रुरतेने वागणुक केल्याची समुपदेशन केंद्रात तक्रार दाखल केली आहे.