गगनभरारी घेण्याचे स्वप्न अनेकांनी पाहीले ते सत्यात उतरण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मराठमोळे शास्त्रज्ञ शिवकर बापूजी तळपदे यांचे नाव घेण्याशिवाय पर्याय नाही. जगातील सर्वात पहीली गगनभरारी घेऊन त्यांनी मोठा इतिहास रचला होता. अशाच एका नव्या अविष्काराच्या शोधात यवतमाळचा शेख इस्माइल याने आपले सर्वस्व पणाला लावले. स्वत:चे हेलिकॉप्टर तयार करण्याचे स्वप्न त्यांनी पाहीले. आपले स्वप्न पूर्ण होण्याकडे पाऊल टाकत असतानाच हेलिकॉप्टरची चाचणी करताना काही तांत्रिक बिघाड झाला. यात हेलिकॉप्टरचा फॅन तुटला आणि त्याचा जबर फटका इस्माईल यांच्या डोक्याला बसला. यात इस्माईल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यावतमाळच्या फुलसावंगी या गावचे शेख इस्माईल हा पेशाने वेल्डरचे काम करत होते. मागील ३ वर्षांपासून आपल्या स्वप्नाने पूरता झपाटलेला इस्माईल हा हेलिकॉप्टर तयार करण्याच्या काम करत होता. इस्माईलचे शिक्षण केवळ ८ वी पर्यंत झाले होते. यातही सवडीप्रमाणे त्यांनी या हेलिकॉप्टरचे एक एक पार्ट तयार केले. १० ऑगस्टला या हेलिकॉप्टरची चाचणी कररून येत्या १५ ऑगस्टला हेलिकॉप्टरचे पेटेंट काढण्याची तयारीही त्यांनी केली होती. मात्र या गगनभारीच्या त्यांच्या स्वप्नाला काळाने ब्रेक लावला. त्यांच्या पश्चात त्यांची आई, वडील, भाऊ, बहीण असा त्यांचा परिवार आहे. या दुर्घटनेने फुलसावंगी गावावर शोककळा पसरली आहे.