यश हाती मिळण्यासाठी त्याला कष्टाची जोड असावी लागते. मात्र काही लोक यश मिळवण्यासाठी शॉटकर्टचा वापर करतात. असाच प्रकार बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडला आहे. उच्च माध्यमिक केंद्रात शिपाई पदासाठी लेखी परिक्षा होती. या परिक्षेसाठी अनेकांनी केंद्रावर उपस्थिती लावली. मात्र एका अवलियांने परिक्षेत पास होण्यासाठी तोंडावरील मास्कचा वापर केलाय.
कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक असल्याचा फायदा या विद्यार्थ्याने घेतला. मास्कच्या आत एक विशिष्ठ प्रकारचे डिवाईस लावून त्याचा वापर प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी करत होता. परिक्षकांच्या हे लक्षात आल्यावर त्या विद्यार्थ्याचा तपास केला असता सर्व प्रकार उघड झाला. त्यामुळे परिक्षकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. केंद्रअधीक्षक छट्टू यादव यांनी ही माहीती दिली.
त्याच्या मास्कमध्ये बॅटरी, मोबाईल बोर्ड, सिम, चार्जर पिन असे सर्व साहित्य त्याच्या डिवाईसला जोडलेले होते. त्याच्या मास्कमधील डिवाईसला तांब्याची एक पातळ तार होती. ती त्याच्या कानाला लावलेल्या ब्व्यू टुथला जोडलेली होती. अशा अनोख्या कॉपीची शक्कल परिक्षकांच्याही डोक्याला मुंग्या लावून गेली आहे.