पुण्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय क्रीकेट मालिका सुरू आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महाराष्ट्र असोसिएशनच्या स्टेडीयममध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून एका चाहत्याने चक्क स्टेडीयम जवळच्या डोंगरावर जाऊन तिरंगा फडकावत टीम इंडीयाला प्रोत्साहन दिले. सुधीर गौतम असे या चाहत्याचे नाव असून मैदानाबाहेरून त्याने टीम इंडीयाला चीअर अप केले. सामना सुरू असताना एका समालोचकाने सुधीरला इतक्या लांबून काही दिसत असेल का असा प्रश्न विचारला.
यावर दुसऱ्या समालोचकाने त्याला काहीतरी दिसत असेलच असे उत्तर दिले. भारतीय संघ जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा तेव्हा सुधीर गौतम त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रध्वजासह उपस्थित असतो. भारताचा माजी क्रीकेटपट्टू सचिन तेंडूलकरचा तो जबरा फॅन आहे. काही दिवसांपूर्वी संपलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमधील सामन्यात सचिन आणि भारतीय संघाला पाठिंबा देताना तो दिसला होता.