Home ताज्या बातम्या भारतीय संसदेतील शोक प्रस्तावाची सर्वात मोठी यादी काल झाली सादर

भारतीय संसदेतील शोक प्रस्तावाची सर्वात मोठी यादी काल झाली सादर

293
0
संसदेच पावासाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यात प्रथेप्रमाणे दोन अधिवेशनादरम्यान दिवंगत संसद सदस्यांचा शोक प्रस्ताव मांडण्यात येतो. या शोक प्रस्तावाचा हा आकडा तब्बल ५०च्या घरात गेल्याचे देशात पहिल्यांदाच घडले आहे.

दोन अधिवेशनादरम्यान दिवंगत झालेल्या आजी-माजी संसद सदस्यानां शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली दिली जाते. ही संसदेच्या कामकाजाची पद्धत आहे. यावेळीच्या पावसाळी अधिवेशनाच्या आकड्याने तब्बल पन्नाशी गाठली आहे. कोरोना काळातील व देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी शोकप्रस्ताव यादी असल्याचे बोलले जात आहे. यावर राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार मनोज कुमार झा यांनी केद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

कोरोनाची स्थिती व त्यात होणारी सामान्य माणसाची हेळसांड ही कोणालीही नवी नाही. जानेवारी महिन्यात वैज्ञानिकांनी दुसऱ्या लाटेची शाशंकाता व्यक्त केली असतानाही, त्याला कोणी गांभीर्याने घेतले नाही. यादरम्यान देशातील पाच राज्याच्या निवडणुका घेण्यात आल्या, कुंभमेळ्याला परवानगी दिली गेली. तिथे गर्दी टाळण्याची गरज होती तिथे जाणतेपणाने गर्दी करण्यात आली. याचा संपूर्ण परिणाम हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर म्हणजेच एप्रिल महीन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जून महीपर्यंत झाला. या दुसऱ्या लाटेत युवक वर्ग मोठ्यासंख्येने दगावला. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्यावर अत्याधुनिक उपचाक करुन देखील कोरोनाने ४५ व्या वर्षात त्यांचा बळी घेतला. देशातील लोकनेत्यांवरही अशी वेळ यावी यासारखे देशाचे मोठे दुर्भाग्य नाही. आपल्या देशात उपचार, ऑक्सिजन, लस या साऱ्याचा तुटवड्यात दुसऱ्या लाटेने थैमान घातले. भविष्यात देखील परिस्थिती अशीच राहीली तर कठीण काळाला सामोरे जावे लागेल. संसद सदस्यांसारखी मोठी आसामी जर कोरोना काळात नाहक बळी होत असेल तर पुढे येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेत सामान्य माणसाची अवस्था ही विदारकच अशू शकते. त्यामुळे स्वत:चे संरक्षण करुन आपल्या परिवाराचे संरक्षण करणे हिच जबाबदारी सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी.

या विदारक परिस्थितीवर खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत आठ मिनिटांचे भाषण केले. यात त्यांनी देशातील सर्व नागरीकांना समान वागणुक देण्याची मागणी केली. यासोबतच केंद्र सरकारवर ताशेरे ओढून, मरण पावलेल्या सदस्यांची सर्वांनी माफी मागावी, अशी कठोर मागणीही त्यांनी आपल्या भाषणातून केली.

Previous articleकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या आयुष्यातील पोकळी ‘राष्ट्रवादी जीवलग’ भरुन काढणार
Next articleपावसाळ्यात गाडी सुरू करण्याआधी करा बॉनेट चेक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here