Home ताज्या बातम्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीची पोलखोल, IAS राणी सोयमोईची कहाणीचा पर्दाफाश

व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीची पोलखोल, IAS राणी सोयमोईची कहाणीचा पर्दाफाश

378
0
आयएएस अधिकारी राणी सोय मोई यांची होणारी काल्पनिक व्हायरल स्टोरीची सत्यता आली समोर

आजकाल समाजमाध्यमांवर घडणारी एखादी गोष्ट पुढच्या काही क्षणात एवढं मोठं स्वरूप घेते की, याचा काही नेम नाही. ज्याला कोणताही पाया नसतो मात्र खबर ही वाऱ्यासारखी फिरते. यालाच सामाजमाध्यामाच्या भाषेत व्हॉट्सॲप युनिव्हरसिटी म्हणतात. याच व्हॉट्सॲप युनिव्हरसिटीमध्ये मागील काही दिवसापासून मेकअप न करणाऱ्या IAS अधिकारी राणी सोयमोईची काहाणी जगभर फिरते आहे. व्हॉट्सॲपवर नवं गाणं, नकला, एखादी घटना किंवा अशा काही स्टोरीज वाऱ्यासारख्या पसरून एक खुल्या ज्ञानाचं मात्र बीनबुडाचं दालन उभ राहीलं आहे. मात्र आयएएसच्या या काहाणीला खरचं ठोस पाया आहे का याची माहीती आता स्पष्ट झालीये.

IAS अधिकारी राणी सोयमोईची स्टोरी काय आहे

व्हॉट्सॲपवर फिरणारी IAS राणी सोयमोईची गोष्ट अनेकांना भावली आहे. या गोष्टीत कलेक्टर मेकअप का करत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर कलेक्टर राणी सोयमोई यांनी उत्तरही दिलं. ज्यामध्ये त्यांनी झारखंडमध्ये आदिवासी गरीब घरात बालपण गेलं, लहानपण त्यांनी अभ्रकाच्या खाणीत काम केलं, मग त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू होतो आणि राणी एका कलेक्टरच्या माध्यामातून सरकारी शाळेत शिकून तीही कलेक्टर होते. अशी सविस्तर स्टोरी तयार करण्यात आली आहे.

आता याची खरी स्टोरी वाचा

IAS अधिकारी राणी सोयमोईची स्टोरी पूर्पपणे काल्पनिक आहे. ही स्टोरी मल्याळम लेखक हकीम मोरायुर यांनी लिहिलेल्या “शायनिंग फेसेस” या पुस्तकातील एक भाग आहे. तसेच राणी सोयमोई हे पात्रही याच कथेतील आहे. मग या स्टोरीमध्ये व्हायरल होणारा फोटो नेमका कोणाचा असा प्रश्न पडत असेल तर हा फोटो खऱ्या IAS अधिकाऱ्याचा फोटो लावण्यात आला. IAS अधिकारी शाईनमोल यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून फोटो वापरण्यात आला आहे.

IAS अधिकारी शाईनमोल या केरळच्या वॉटर ऑथॉरीटीच्या मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. त्यामुळे ही सर्व स्टोरी बीनबुडाचीच असल्याचे स्पष्ट होतेय. यारव लेखक हकीम मोरायुर यांनीही फेसबुक पोस्ट करून या सर्व व्हायरल स्टोरीला पूर्णविराम लावला आहे.

Previous article महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील कासवांवर ‘सॅटेलाईट टॅगिंग’चा प्रयोग
Next articleराज्यात पुन्हा येणार थंडीची लाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here