देशात तसेच राज्यात झालेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. अनेक जिल्ह्यात त्या परिस्थितीनुसार नियमावली कडक करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार बीड, यवतमाळ, पुणे यासारख्या अनेक जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत.
मात्र कोरोनाचा वाढता आलेख पहाता मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी १२:३० वाजता व्हिसीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. असे विश्वसनीय सूत्रांच्या माहीतीनुसार सनजते आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.