युक्रेन आणि रशियाच्या पार्श्वभूमीवर सध्या हजारो भारतीय विद्यार्थी सध्या युक्रेनमध्येच अडकून आहेत. त्यातील बहुतांशी विद्यार्थी तेथे मेडिकल या विषयात डिग्री घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात प्रगत होण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनला का पसंती देतात?
कमी फी
डिग्री घेण्यासाठी युक्रेनमध्ये भारतापेक्षा खूप कमी फी आहे.
युक्रेन – १५ ते २२ लाख रुपये (सहा वर्षांसाठी)
भारत – साधारणत: ६० लाख ते १.१ करोड रुपये खाजगी महाविद्यालयासाठी
भारतामध्ये वैद्यकीय जागांची असलेली कमतरता
भारतामध्ये एम.बी.बी.एस अभ्यासक्रमाच्या फक्त ८४ हजारांच्या आसपास जागा आहेत. मात्र दरवर्षी तब्बल १६ लाखांच्या आसपास विद्यार्थी नीटच्या परिक्षेसाठी प्रयत्न करतात.
जागतिक मान्यता
युक्रेनमधील एम.बी.बी.एस अभ्यासक्रमाला जागतिक मान्यता आहे. ज्यामध्ये भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचाही समावेश आहे.
युक्रेनमधील वैदयकीय शिक्षणाच्या सुविधा
३३ वैद्यकीय महाविद्यालये
सुयोग्य पायाभूत सुविधा
पुस्तकी तसेच प्रात्यक्षिक ज्ञानावर भर
भारतातील संधी
विद्यार्थ्यांनी परकीय वैद्यकीय परिक्षा देणे अनिवार्य आहे.
ज्यांनी या परिक्षा पास केल्या ते विद्यार्थी आंतर्वासिता प्रकल्प आणि वैद्यसेवेसाठी पात्र ठरतात.
इतर देश जिथे भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असतात