जगात अनेक महान व्यक्ती झाल्या आहेत. काहींनी आपल्या कर्तुत्वाने उंची गाठली तर अनेकांनी आपल्या उंचीनेच कर्तुत्व सिद्ध करून दाखवले. अशी एक घटना सध्या सोशल मीडीयावर चांगलीच चर्चेत रंगली आहे. राऊटर्स या वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्वीटर हँडलवर स्वामी नारायण नंद यांचा व्हीडिओ अपलोड केला. हरीद्वार येथे यावर्षीच्या कुंभमेळ्यात स्वामी नारायण नंद हे आपल्या उंचीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांची उंची केवळ १८ इंच असून वजन जेमतेम १८ किलो इतक आहे. ५५ वर्षांचे नारायण नंद महाराज चालू-फिरू शकत नाहीत. त्यांची देखभाल त्यांचे अनुयायी करतात. त्यांच्या हा व्हीडिओ अगदी थोड्या वेळात तब्बल ६४ हजार लोकांनी पाहीला आहे.
Narayan Nand Giri is 18-inches tall and is considered as the ‘world’s smallest saint’ pic.twitter.com/5eRbdEdrs5
— Reuters (@Reuters) March 30, 2021
स्वामी नारायण नंद मध्य प्रदेशातील झांसीचे रहीवासी आहेत. त्यांनी नागा संन्यासींची दिक्षा प्राप्त केली. दरम्यान नागा साधू बनण्याआधी त्यांचे नाव सत्यनारायण पाठक असे होते. आता त्यांना नारायण नंद महाराजांच्या नावाने ओळखलं जातं आहे.