Home ताज्या बातम्या बस चालवत हॉस्पिटल गाठून योगिता सातव ठरल्या बस चालकाच्या ‘देवदूत’

बस चालवत हॉस्पिटल गाठून योगिता सातव ठरल्या बस चालकाच्या ‘देवदूत’

180
0
पुण्याच्या योगिता सातव यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले बस चालकाचे प्राण.

आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवण्यात मागे नाहीत. सामान्य गृहीणीपासून एक यशस्वी उद्योजक महिला ही नेहमीच आपल्या कामगिरीत अव्वल ठरली आहे. अशीच एक घटना आज पुण्यातील वाघोली येथे घडली आहे. बस चालकाला अचानक फिट आल्याने बस प्रवासात मोठे विघ्न आले. मात्र याच बसमधील एका महिलेने प्रसंगावधान साधून बस चालवत बस थेट हॉस्पिटलला घेऊन गेली. योगिता सातव या महिलेचं नाव असून समाजमाध्यमांमध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नेमकं प्रसंग काय घडला?

पुण्याजवळील वाघोली येथे महिलांचा एक ग्रुप बसने मोराची चिंचोळी येथे पर्यटनासाठी निघाला होता. या प्रवास सुरू असताना बस चालकाला अचानक फिट आल्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. याच बसमध्ये योगिता सातव देखील होत्या. अचानक आलेल्या प्रसंगाला योगिता सातव यांनी अगदी संयमाने हाताळून आलेले संकट हाळून पाडले.

योगिता यांना चारचाकी चालविण्याचा अनुभव होता. याआधी कधीही त्यांनी बसगाडी चालवलेली नाही. मात्र आलेले संकट लक्षात घेऊन त्यांनी आपला पुढाकार घेत थेट स्टेअरिंग हातात धरले. पुढे दहा किलोमीटर गाडी चालवून त्यांनी बस चालकाला थेट हॉस्पिटलला नेले. बस चालकाच्या आयुष्यावर आलेल्या संकटात योगिता सातव देवदूत ठरल्या आहेत. याशिवाय आपल्या सहकाऱ्यांनाही त्यांनी या संकटातून सुखरूप बाहेर काढले आहे. या कामगिरीचे समाजमाध्यमांवर सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleमुंबईतील किल्ल्यांना मिळणार नवी झळाळी
Next articleबुक्कीत टेंगूळ देणारा टिकटॉक स्टार सूरज चव्हाण रुपेरी पडद्यावर झळकणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here