जगभरात वाढणाऱ्या कोरोना विषाणुचा फौलाव व त्यातून होणारा संहार फारच गंभीर आहे. यावर भारताच्या सिरम इंस्टीट्युटने तयार केलेल्या लसीवर केंद्राने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. मात्र योगगुरु बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या कोरोनिल या औषधाच्या प्रमोशनला देशाचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित राहण्याने त्यांना चांगलेच महागात पडले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेने या प्रकरणात डॉ. हर्षवर्धन यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे.
यावरही ‘कोरोनिल’ या औषधाला WHO ने मान्यता दिल्याचे पतंजलीने सांगितले. मात्र हे धादांत खोट असून, WHO ने हा दावा फेटाळून लावला आहे. तरीदेखील केंद्रीय मंत्री या औषधाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहीले या भुमिकेवर देशातील खाजगी डॉक्टर नाराज आहेत. यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे, असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे मानद महासचिव डॉ. जयेश लेले यांनी म्हटलं.
डॉ.हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमात आपले मत मांडताना आयुर्वेदाची उपयोग्यता आणि प्रामाणिकता आहे असे सांगितले. भविष्यात लोकांना निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदाची मदत नक्की होईल. याबाबत कोणालाही शंका असण्याचं कारण नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे आता डॉ. हर्षवर्धन यांनी याचा खुलासा काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
‘कोरोनिल’चे प्रमोशन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पडले महागात
:- पतंजलीने तयार केलेल्या Covid-19 वरील औषधाच्या प्रमोशनसाठी उपस्थित राहणं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना चांगलच भोवले आहे. देशभरातील खाजगी डॉक्टर्स यावर नाराज असून त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा खुलासा करण्याची मागणी IMA या संघटनेने केली आहे.