Home लाईफस्टाईल डोळ्यांखाली काजळ पसरू नये यासाठी या ५ टिप्सचा वापर करा

डोळ्यांखाली काजळ पसरू नये यासाठी या ५ टिप्सचा वापर करा

665
0

काजळ हे डोळ्यांचे सौंदर्य खुलवतं आणि डोळ्यांना आकर्षक बनवते. महिला सौंदर्य खुलवण्यासाठी काजळला प्राधान्य देतात. काजळचा उपयोग प्राचीन काळापासूनच होत आहे. आजच्या मुलीची काजळचा वापर स्टाईल स्टेटमेंट म्हणून करतात. पण बऱ्याचदा काजळ पसरते आणि त्यामुळे मुली किंवा महिला काजळ वापरणे टाळतात. काही मुली स्मज प्रूफ काजळचा वापर करतात पण तरीसुद्धी त्यांचे काजळ पसरते. खरंतर काजळ पसरण्याचे खरे कारण ऑयली पापण्या (Oily eyelids)आहेत. त्यामुळे ज्यांची त्वचा ऑईली आहे त्यांनी काजळ लावताना विशेष काळजी घ्यायला हवी. काजळ पसरू नये यासाठी जाणून घेऊया काही खास टिप्स.

आईस वॉटरने चेहरा धुवा

जेव्हा तुम्हाला काजळ लावायचे असेल तेव्हा डोळ्यांना सर्वांत आधी आईस वॉटरने धुऊन घ्या. कॉटन आईस वॉटरमध्ये बुडवून डोळ्यांवर आणि डोळ्यांच्या आजूबाजूला डॅब करावे. यामुळे घाम आणि ऑईन कमी होत राहील. त्यानंतर स्वच्छ कपड्याने चेहरा पुसून घ्यावा. जेणेकरून चेहऱ्यावरील ऑईल कमी होईल आणि काजळ पसरणार नाही.

टोनरचा वापर करा

तुमच्या ऑईली स्किनला ऑईल फ्रि करण्यासाठी मेकअप करण्याआधी टोनरचा वापर करावा. एका कॉटनवर टोनर लावून त्याने पापण्या पुसून घ्याव्यात. याने डोळ्यांजवळील ऑईल कमी होईल.

पापण्यांवर फाऊंडेशन लावा

जेव्हा तुम्ही मेकअप कराल तेव्हा पापण्यांवर फाऊंडेशन लावा. ऑईली प्रोडक्सचा पापण्यांवर वापर करू नका. अश्याने तुमचं काजळ पसरणार नाही आणि हायलाईट होईल.

पापण्यांना पावडर लावा

डोळ्यांना काजळ लावल्यानंतर पापण्यांना पावडर लावा. असं केल्याने डोळ्यांचा भाग कोरडा राहील आणि काजळ पसरणार नाही.

काजळ खरेदी करताना काजळी घ्या

काजळ खरेदी करत असाल ते स्मज प्रूफ, स्मज फ्री किंवा लॉंग स्टे असेल याची काळजी घ्यावी. 

Previous articleसांगली महापालिकेप्रमाणे राज्यात इतर ठिकाणीही भाजपाला धोबीपछाड देऊ – नाना पटोले
Next articleया ड्रेसमुळे प्रियंका झाली ट्रोल… मिम्समुळे प्रियंकालाही हसू आवरले नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here