Home लाईफस्टाईल १५ वर्षीय हार्दिकने WhatsApp ला दिली टक्कर

१५ वर्षीय हार्दिकने WhatsApp ला दिली टक्कर

whatsapp च्या काही नवीन नियमावलीमुळे युजर्समध्ये या अॅपविषयी नाराजी वाढली आहे. यालाच पर्याय म्हणून हार्दिक कुमार दिवानने बीटल हे चॅटिंग अॅप्लिकेशन बाजारात आणले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने whatsapp पेक्षा प्रभावी असे हे अॅप्लिकेशन आहे

579
0

whatsapp ने आपल्या नव्या पॉलिसीमुळे whatsapp युजर्समध्ये नाराजी वाढली आहे. आता अनेकजणांचा या चॅटिंग अॅप्लिकेशनला पर्यायी मार्ग शोधण्याकडे कल वाढला आहे.whatsapp च्या पर्यायाला एक भारतीय अॅप बाजारात आले आहे. हरियाणाचा हार्दिक कुमार दिवान या विद्यार्थ्याने एक अॅप तयार केले आहे. बीटल या चॅटिंग अॅप्लिकेशनमध्ये सुरक्षेच्या सर्व गोष्टींची हमी देण्यात आली आहे. whatsapp ला तोडीस असे हे चॅटींग अॅप्लिकेशन वापरण्यात हरकत नाही.

या आधी हार्दिक युट्युबवर कुकिंगचे व्हिडीओ बनवत होता. कालांतराने त्याची कॉम्प्युटरमध्ये आवड वाढली. हार्दिकने ऑनलाईन कोडींग क्लास घेण्याकडे आपली रुची दाखवली. यातूनच बिटल हे अॅप्लिकेशन तयार करण्याचा हार्दिकने निर्णय घेतला. तब्बल तीन महीने प्रयत्न करून हे अॅप्लिकेशन युजर्ससाठी गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध झाले आहे. हळूहळू यात अपडेट होऊन पुढील काळात आयओएस प्लॅटफॉर्मवर येणार असल्याची माहीती हार्दिकने दिली आहे. त्यामुळे सर्वांसाठीच हे अॅप उपलब्ध होऊ शकेल. हे नवे भारतीय अॅप बनवणारा हार्दिक केवळ १५ वर्षाचा आहे. त्याच्या या कर्तुत्वाची दाद अनेकांनी घेतली आहे. देशभरातील अनेकांनी या अॅपला स्विकारले असून आपणही हे भारतीय अॅप वापरात आणावे अशी विनंती हार्दिकने केली आहे.

Previous article७६९ रुपयांचा एलपीजी गॅस आता ६९ रुपयात, जाणून घ्या ऑफर
Next article“काढून टाका ओ मास्क, काही नाही होत”, संभाजी भिंडेचा आमदाराला सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here