उद्यापासून आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे अर्थात मार्च सुरू होत आहे. अर्थातच बँकांचे कर्मचारी उद्यापासून ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे व्यस्त असणार. बँकेच्या कार्यकालीन कामकाजाव्यतिरिक्त त्यांच्यावर आर्थिक वर्षाची ताळमेळ घालण्याचाही अतिरिक्त बोजा असेल. मात्र त्यासोबतच नागरिकांनाही एका गोष्टीमुळे बँकेचे व्यवहार करायला दिरंगाई होऊ शकते. कारण मार्च महिन्यामध्ये बँकांना तब्बल आठ दिवस बंद असणार आहे. त्यामुळे बँकेच्या कामेचं नियोजन करताना मार्च महिन्याच नेमक्या बँका किती दिवस सुरु आहेत आणि किती दिवस बंद आहेत, हे पाहूनच नियोजन करा. मार्च महिन्यामध्ये आठ दिवस बँका बंद राहणार असून या सुट्ट्या खालीलप्रमाणे असणार आहेत.