ग्रेट ब्रिटनमध्ये राहणारे ५५ वर्षीय एंड्र्यू बेलीथ हे वीस वर्षापूर्वी एक यशस्वी उद्योजक होते. त्यांचा इलेक्ट्रिकल आणि प्लम्बिंगचा खूप मोठा उद्योग होता. ज्याद्वारे ते वर्षाला एक अब्ज रूपयांहून जास्त कमवत होते.
मात्र त्यांच्या जीवनात एक वेळ अशी आली की, त्यांची सर्व संपत्ती समाप्त झाली. त्यांना उद्योगधंद्यात झालेल्या नुकसानानंतर त्यांना दारू आणि ड्रग्सची सवय लागली. ‘मिरर’ या वृत्तवाहिनीनुसार २०१८ साली एंड्र्यू बेलीथ हे क्रोएशियाला सुट्टीसाठी गेले होते. तेव्हा त्यांनी एक मोठ्या रक्कमेचा करार गमावला होता.
एक्सेस लाइवच्या रिपोर्टनुसार, त्याच वेळेला त्यांना माहित पडले की त्यांच्या पत्नीला स्तनांचा कॅन्सर झाला आणि नेमके त्याच वेळेला त्यांच्या आईला ह्रद्यविकाराचा झटका येऊन गेला. त्यांना याची माहिती जेव्हा मिळाली तेव्हाच त्यांच्या अतिजवळच्या मित्राने आत्महत्या केली. एवढंच नाही तर त्याचवेळेला त्यांचा मुलगा आजारी पडला. त्याला ह्रदय व यकृतासंदर्भातला आजार बळावला होता.
एंड्रयू याने सांगितले की, त्यावेळेला ते आपल्या पत्नीसोबत नव्हते आणि त्यामुळे ते आपल्या पत्नीची काळजी घेऊ शकले नाहीत. त्यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या पत्नीची काळजी न घेता पण फक्त आपल्या उद्योगावर लक्षकेंद्रित केले होते. ते त्या वेळेस स्वत:ला खूप एकटे एकटे समजत असत. त्यावेळेला त्यांच्याकडे खूप पैसे होते मात्र त्यांचे त्यांच्या पत्नीकडे फार दुर्लक्ष होत असे.
या सर्वांचा विचार करून करून एंड्रयू दारूच्या आहारी गेले आणि ड्रग्सचे सेवन करू लागले. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ते सतत आपल्या ऑफिसममध्ये राहत असत. त्यांच्या ऑफिसमध्ये एक बेडरूम सेटपण होता. ते वारंवार तेथेच राहणं पसंत करत असत. ते तेथे राहून दारूचे आणि ड्रग्सचे सेवन करत असत. त्यांना अशी आशा होती की, त्यांच्यात सुधारणा होईल मात्र तसे झाले नाही.
खरी समस्या तेव्हा आली जेव्हा एंड्रयू एक दिवस कोणालाही न सांगता एका टूरला निघून गेले. त्यांनी स्वत:चा फोन स्विच ऑफ करून ठेवला होता, त्यांच्याकडचे सर्व पैसे संपून गेले होते. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त दोन बॅग, दोन बुटाचे जोड आणि चार टि-शर्ट शिवाय काहीच सामान नव्हते.
एंड्रयू यांनी सांगितले की, त्यांना कोणाकडेही मदत मागायला फार लाज वाटत होती. ग्रेट ब्रिटनमधल्या सिटीजन्स एडवाइस कडे गेल्यानंतर त्यांनी त्यांची गोष्ट त्यांना ऐकवली, त्यानंतर त्यांना त्यांच्याकडून काही पैसे मिळाले. आता त्यांचे आयुष्य पुन्हा एकदा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गेल्या दोन वर्षात त्यांनी बऱ्यापैकी पैसे कमावले आहेत.