पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेनंतर भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव फार कमी आहे. मात्र जगभरात तसेच भारतातही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची एन्ट्री झालीयं. या नव्या व्हेरियंटचे नाव XE असे आहे. भारतात प्रामुख्याने दिल्ली व मुंबई येथे या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडूनही भारतात चौथ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी जाहिर केलेल्या मागच्या २४ तासाच्या आकडेवारीनुसार १००७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच भारतात सदयस्थितीला कोरोना रूग्णांची संख्या ११,०५८ इतकी झाली आहे.
गुरूवारी आलेली आकडेवारी ही भारतातील गेल्या ८० दिवसातील सर्वोच्च आकडेवारी आहे. भारतातल्या १८ राज्य व केंद्र शासित प्रदेशात गेल्या २४ तासांमध्ये सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येते. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये XE व्हेरियंटचे २ केसेस निदर्शनास आले आहेत.
मुंबई व दिल्लीची सद्यस्थिती
दिल्ली, दिल्ली एनसीआर आणि मुंबई मध्ये कोव्हिड१९ च्या केसेस हळूहळू वाढत आहेत. बुधवारी दिल्लीमध्ये २९९ नवीन केसेस समोर आल्या असून पॉझिटिव्हीटी दर २.४९ इतका झाला आहे. दिल्ली एनसीआर भागात गेल्या २४ तासात ४४ नवे रूग्ण सापडले आहेत. तर मुंबईमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे ७३ नवे रूग्ण सापडले आहेत.
डॉक्टरांच मत काय?
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, XE या नव्या व्हेरियंटची लक्षणे ही जवळपास ओमिक्रॉन सारखीच आहेत. XE व्हेरियंट हा गेल्या ३ महिन्यात उदयास आला असला तरी ओमिक्रॉन ज्या स्तरावर संपूर्ण जगात पसरला होता त्या स्तरावर तो पसरलेला नाही.
XE व्हेरियंटची लक्षणे
– थकवा
– आळस येणे
– ताप
– डोकेदुखी
– शरीर दुखणे
– भीती वाटणे
– ह्रदयासंबंधी समस्या